अ‍ॅपशहर

जेमिमाने असं केलं तरी काय की लोक दिल्लीचा विजय विसरले आणि मुंबईचा पराभव देखील; पाहा VIDEO

Jemimah Rodrigues Catch: डी.वाय पाटील येथे झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स मधील सामन्यात जेमिमाने शानदार डाईव्ह कॅच घेऊन दिल्लीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

Edited byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2023, 3:33 pm
नवी मुंबई: महिला प्रिमियर लीगमधील १८वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. डबल्यूपीएल २०२३च्या पहिल्या हंगामात सुरुवातीपासून सगळे सामने जिंकत आलेल्या मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी त्यांचा युपी वॉरिअर्स आणि आता दिल्ली कॅपिटल्सने लाजिरवाणा पराभव केला. दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेला मुंबईचा संघ आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर दिल्लीने पहिले स्थान मिळवले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jemimah Rodrigues catch MI vs DC


डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या लढतीत दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. मुंबईला २० षटकांत ९ विकेटच्या बदल्यात फक्त १०९ धावाच करता आल्या. दिल्ली कॅपिट्लने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विजयाचे लक्ष्य ९व्या षटकात पार केले. या लढतीनंतर मुंबईच्या पराभवाची किंवा दिल्लीच्या विजयाची नव्हे तर सामन्यातील एका कॅचची चर्चा सुरू झाली.

टीम इंडियाचा सलामीवीर आता टीव्ही मालिकेत काम करणार; मिळाली ही खास भूमिका
दिल्लीच्या विजयात एका खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताची स्टार ऑलराउंडर जेमिमा रॉड्रिग्सने या लढतीत असा एक कॅच घेतला ज्यावर ना मुंबईच्या फलंदाजाचा विश्वास बसला, ना मैदानावरील अंपायर्सचा ना खुद्द दिल्ली संघातील अन्य खेळाडूंचा...


मुंबईच्या डावातील चौथ्या षटकात शिखा पांडे गोलंदाजी करत होती. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एलिसा मॅथ्यूजने चौकार मारण्यासाठी शॉट मारला, मात्र मिड-ऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या जेमिमाने शानदार डाईव्ह मारून चेंडू पकडला. महिला क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा कॅच नेहमी पहायला मिळत नाही. तिचा कॅच इतका अफलातून ठरला ज्यावर काही क्षण कोणाचा विश्वास बसला नाही. या कॅचने मॅथ्यूजला फक्त ५ धावांवर माघारी परतावे लागले. या स्पर्धेत मॅथ्यूजचा कॅच पकडण्याची जेमिमाची दुसरी वेळ आहे.


दिल्ली संघाच्या विजयात जेमिमाने आतापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. या हंगामातील ६ सामन्यात १३१च्या स्ट्राइक रेटने ११४ धावा केल्या आहेत. मुंबईविरुद्ध झालेल्या लढतीत जेमिमाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. कारण दिल्लीने विजयाचे लक्ष्य सहज पार केले.

लाचारीची हद्दच झाली; टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये येण्यासाठी शाहिद आफ्रिदीचा भारतावरच आरोप
या लढतीत दिल्लीची जलद गोलंदाज मारिजन कापने ४ षटकात १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर शिखा पांडे आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. दिल्लीकडून मॅग लॅनिंग (३२) आणि अॅलिस कॅप्सी (३८) च्या मदतीने ९ षटकातच लक्ष्य गाठलं. दोन्ही संघ याआधीच नॉकआउट फेरीत पोहोचले आहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख