अ‍ॅपशहर

'भारताच्या ११ खेळाडूंविरुद्ध संपूर्ण दक्षिण आफ्रिका मैदानात उतरली आहे' मैदानात झाला मोठा राडा, पाहा व्हिडीओ...

केप टाऊन कसोटीच्या तिसऱ्या कसोटीत आज चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भारताचा खेळाडू चांगलाच भडकला आणि भारताच्या ११ खेळाडूंविरुद्ध संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा देशच उभा ठाकला आहे, असे वक्तव्य त्याने केले. पाहा नेमकं घडलं तरी काय....

Maharashtra Times 14 Jan 2022, 7:36 am
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केप टाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानात चांगलाच राडा झाला. यावेळी भारताचा एक खेळाडू चांगलाच भडकला आणि आमच्या ११ जणांविरुद्ध संपूर्ण देशच मैदानात उतरला आहे, असं म्हणत त्याने वादाला नवं तोंड फोडलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लोकेश राहुल (सौजन्य-ट्विटर)

पाहा नेमकं घडलं तरी काय...
तिसऱ्या दिवशी भारतीय संघ विजयासाठी जीवाचे रान करत असताना एक अशी गोष्ट घडली की, भारताचे खेळाडू चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. भारताच्या लोकेश राहुलने तर यावेळी आपल्या ११ खेळाडूंच्या विरोधात संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा देशच उभा ठाकला आहे, असे म्हटले आहे.या षटकाच्या चौथ्या चेंडूचा सामना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर करत होता. हा चेंडू थेट एल्गरच्या पॅडवर आदळला आणि भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केल्याचे पाहायला मिळाले. मैदानातील पंचांनीही एल्गरला बाद दिले आणि भारतीय खेळाडूंनी आनंद साजरा करायला सुरुवात केली. पण त्यावेळी एल्गरने डीआरए घेतला. जेव्हा डीआरएसमध्ये बॉल ट्रॅकिंग दाखवण्यात आले त्यावेळी हा चेंडू स्टम्पला लागत नसल्याचे पाहायला मिळाले. यावर मैदानातील पंचांचाही विश्वास बसत नव्हता. त्याचवेळी कोहली मैदानात चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी कोहली स्टम्पजवळ आला आणि तिसऱ्या पंचांची लाज काढली. हे सर्व दक्षिण आफ्रिकेला जिंकवण्यासाठी चाललंय का, असा त्याचा बोलण्याचा रोख होता. त्यानंतर राहुलही चांगलाच भडकलेला होता आणि त्यानंतर त्याने आपल्याविरोधात संपूर्ण दक्षिण आफ्रिका उभी ठाकली आहे, असे म्हटले. पण या दिवसाचा शेवट डीन एल्गरच्या विकेटनेच झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने चौथ्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर डीन एल्गरची विकेट मिळवली आणि विजयाचा शंख फुंकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता संक्रातीच्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेचा पतंग ते गुल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची २ बाद १०१ अशी स्थिती असून ते विजयापासून १११ धावा दूर आहेत. दुसरीकडे भारताला विजय मिळवण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भारताच्या विजयाच्या मार्गातील एल्गर हा मोठा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष चौथ्या दिवसावर असेल.

महत्वाचे लेख