अ‍ॅपशहर

भारताचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री ९.३० वाजता का सुरु होणार, जाणून घ्या मोठं कारण

Ind Vs Wi 3rd T20 Timing : या मालिकेत हे दोन सामने एकामागून एका दिवशी ठेवणे ही आयोजनातील मोठी चूक असल्याचेही आता समोर आले आहे. कारण दोन सामन्यांमध्ये किमान एका दिवसाचा तरी गॅप असायला हवा होता. जर दोन सामन्यांमध्ये एक दिवसाचा जरी गॅप असला असली तर तिसऱ्या सामन्याची वेळ पुढे ढकलण्याची वेळ आली नसती.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 2 Aug 2022, 7:49 pm
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आजचा तिसरा सामना हा रात्री ८.०० वाजता नाही तर ९.३० वाजता सुरु होणार आहे. हा तिसरा सामना आज उशिरा का सुरु करण्यात येणार आहे, याचे मोठे कारणही आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs wi time


वाचा-भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना या महिन्यात कधी व कुठे होणार, जाणून घ्या संपूर्ण
भारताचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा तब्बल तीन तास उशिरा खेळवण्यात आला. खेळाडूंच्या किट बॅग्स लवकर आल्या नसल्यामुळे हा सामना सुरु करायला वेळ लागला होता. त्यामुळे हा सामना मध्यरात्री उशिरा संपला. या मालिकेतील तिसरा सामना हा लगेच मंगळवारीच खेळवण्यात येत आहे. त्यामुळे खेळाडूंना एक सामना संपवून दुसरा सामना खेळण्यासाठी थोडी विश्रांती मिळायला हवी, यासाठी आता तिसरा सामना अडीज तास उशिराने खेळवण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. त्यामुळेच आजचा तिसरा सामना हा रात्री. ९.३० वाजता सुरु होणार आहे. या मालिकेत हे दोन सामने एकामागून एका दिवशी ठेवणे ही आयोजनातील मोठी चूक असल्याचेही आता समोर आले आहे. कारण दोन सामन्यांमध्ये किमान एका दिवसाचा तरी गॅप असायला हवा होता. जर दोन सामन्यांमध्ये एक दिवसाचा जरी गॅप असला असली तर तिसऱ्या सामन्याची वेळ पुढे ढकलण्याची वेळ वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळावर आली नसती.

वाचा-भारताला लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकवून देणारे मधुकांत पाठक आहेत तरी कोण, जाणून घ्या...

या मालिकेतील दुसरा सामनाही उशिरा म्हणजेच रात्री ११.०० वाजता सुरु करण्यात आला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा त्रिनिदाद येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यानंतर भारतीय संघ सेंट किट्स येथे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी दाखल झाला. पण त्रिनादादवरून दोन्ही संघाचे सामना हे वेळेत सेंट किट्स येथे पोहोचू शकले नाही. कोणतेही सामान जवळ नसल्यामुळे सामना कसा खेळायचा हा खेळाडूंपुढे प्रश्न होता. त्यामुळे सामन्याची वेळ बदलण्यात आली. यापूर्वी हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरु करण्यात येणार होता. पण खेळाडूंचे सामान न आल्यामुळे हा सामना दोन तास उशिरा सुरु करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने घेतला होता.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख