अ‍ॅपशहर

ललित मोदी-सुष्मिता सेनचे ब्रेकअप? नात्याच्या मध्ये कोण आले; 'या' व्यक्तीच्या नावाची चर्चा

Lalit Modi And Sushmita Sen: उद्योगपती ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यातील नात्यात दुरावा आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पाहा अचानक दोघांच्यात काय झालं.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2022, 7:49 pm
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी आयपीएलचे माजी चेअरमन आणि उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) अचानक चर्चेत आले होते. मोदींनी अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सोबतचे फोटो शेअर करत एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले होते. मोदीने सुष्मिता सोबतचे मालदीवमधील फोटो शेअर केले होते. ही बातमी जोरदार व्हायरल झाली होती. आता दोघांच्या नात्यातील एक मोठी अपडेट समोर येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Lalit Modi And Sushmita Sen


ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या लव्ह स्टोरी आता संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात हे आम्ही नाही तर सोशल मीडियावरील युझर्स म्हणत आहेत. अशी चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे ललित मोदीचे इस्टाग्राम अकाउंट होय. ज्या ललित मोदीने एका महिन्यापूर्वी सुष्मिता सोबतचे नाते संपूर्ण जगाला सांगितले होते त्याच मोदीच्या सोशल मीडिया खात्यावरून दोघांच्या काही ठीक सुरू आहे असे दिसत नाहीय.

वाचा- कोण आहे रयाल बर्ल? फक्त १८ चेंडूत जगजेत्या ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडला

अचानक काय झालं

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यातील नेते संपुष्ठात आल्याची माहिती या दोघांपैकी कोणीही दिली नाही. मात्र युझर्सना ललित मोदीच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये झालेले बदल खटकत आहेत. या बदलावरून असे दिसते की ललित आणि सुष्मिता एकत्र नाहीत. ललितने इस्टाग्राम प्रोफाइलवरून सुष्मिताचे नाव काढून टाकले आहे आणि त्याच बरोबर तिच्या सोबतचा फोटो देखील काढून टाकला आहे.

वाचा-पेट्रोल पंप कसा सुरू कराल? गुंतवणूक किती, कसा मिळवाल परवाना आणि मग बक्कळ नफा

काही दिवसांपूर्वी ललित मोदीने इस्टाग्राम आणि ट्विटवर सुष्मिता सोबतचा फोटो प्रोफाइलला लावला होता. इतक नाही तर प्रोफाइलच्या बायोमध्ये सुष्मिता ही आपले प्रेम असल्याचे म्हटले होते. मी माझ्या पार्टनर सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. माझे प्रेम सुष्मिता सेन, असे ललितने म्हटले होते.



आता मात्र ललित मदीने प्रोफाइल फोटो बदलला आहे. तसेच सुष्मिताचे नाव देखील बायोमधून काढून टाकले आहे. सध्या ललितने आयपीएलचा संस्थापक आणि मून असे लिहले आहे. ललित मोदीच्या प्रोफाइलमधील हे बदल पाहिल्यानंतर दोघांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली.



का झाले ब्रेकअप?

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यातील ब्रेकअपवरून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. या दोघांनी ब्रेकअप संदर्भातील चर्चेवर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी यागे सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख