अ‍ॅपशहर

इंग्लंडची कर्णधार म्हणाली, भारताने आणि दीप्तीने खोटं बोलू नये; मंकडिंगवर नाईटचे धक्कादायक वक्तव्य

Deepti Sharma Mankading Controversy-भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० ने धूळ चारली आहे. तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय फिरकीपटू दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाज चार्ली डीनला मॅंकडिंग रनआउट केले. तेव्हापासून मंकडिंगबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2022, 12:43 pm
लंडन: मंकडिंगने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात चर्चेला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्याने झाली. यामध्ये भारताची फिरकीपटू दीप्ती शर्माने चार्ली डीनला 'मंकडिंग' केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mankading


याबाबत सुरू झालेली चर्चा अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दीप्ती शर्मा आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनंतर आता याप्रकरणी इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटचेही वक्तव्य आले आहे. सर्वांनीच याबाबत आपले मात मांडले आहे. पण याच दरम्यान मंकडिंगमुळे आऊट झालेल्या चार्ली डीननेही आपले मत अत्यंत तणावपूर्ण स्वरात मांडले आहे.

भारतीय क्रिकेटपटूंसमोर घोषणाबाजी, या खेळाडूला टीम इंडियात न घेतल्याने संतापले चाहते

चार्लीची पोस्ट

चार्लीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने टीमचे काही फोटोही शेअर केले आहेत. तसेच पोस्टमध्ये एक ओळ लिहिताना चार्लीने सांगितले की, ती आतापासून तिच्या क्रीजवरच राहणार आहे. रनआउट झाल्यानंतर शार्लोट डीनचे डोळे ओले झाले होते. चार्ली इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली, " लॉर्ड्सवर इंग्लंडच्या संघाबरोबर खेळणे हा मोठा सन्मान आहे. चार्लीने या सर्व गोष्टी एका ओळीत सांगितल्या. यानंतर एक ओळ स्वतंत्रपणे लिहिली गेली, ज्यामध्ये 'मंकाडिंग' आऊटलाही टोमणे मारण्यात आले. तिने लिहिले, 'मला वाटते की मी आतापासून माझ्या क्रीजवरच असेन.'

माझ्या खोलीत घुसून त्यांनी..., भारतीय महिला क्रिकेटपटूसोबत इंग्लंडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

दीप्तीने आऊट करण्यापूर्वी इशारा दिला होता

मॅचनंतर दीप्ती शर्मा म्हणाली होती की, तिने इंग्लिश बॅट्समन चार्ली डीनला मॅंकडिंग आऊट करण्यापूर्वी क्रीज सोडण्याबाबत अनेकदा इशारा दिला होता. दीप्ती म्हणाली, 'रन आऊट होण्यापूर्वी मी डीनशी बोलली आणि सांगितले की जर तिने क्रीज सोडली तर ती रनआउट होईल. त्यामुळे आम्ही जे काही केले ते नियमानुसार होते. आम्ही पंचांनाही सांगितले. पण ती पुन्हा पुन्हा तेच करत होती, त्यामुळे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.'

रोहित शर्माच्या प्लॅनमध्ये दिनेश कार्तिकच! टी-२० वर्ल्ड कपमध्ये पंतला डच्चू देणार?

हीथर नाइट म्हणाली....

यानंतर इंग्लंड संघाची कर्णधार हिदर नाइटने दीप्तीचे दावे फेटाळून लावले. तिने ट्विट केले की, 'खेळ संपला आहे, चार्ली कायदेशीररित्या बाद झाली. भारत सामने आणि मालिका जिंकण्यास पात्र होता. मात्र कोणताही इशारा देण्यात आला नाही. त्यांना देण्याची गरजही नव्हती. त्यामुळे तसे करणे किंवा न करणे आणि धावबाद होणे बेकायदेशीर म्हणता येणार नाही.
दुखापतीमुळे हिदर नाईट भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी झाली नव्हती. "परंतु जर ते धावबाद करण्याच्या निर्णयाशी सहमत आहेत तर भारताला खोटे बोलून त्याचे समर्थन करण्याची गरज वाटू नये," असं नाईट म्हणाली.


निर्णायक सामन्यात मुंबईच्या सूर्यकुमारने जीवाची बाजी लावली; डाॅक्टरांना म्हणाला, काही ही करा पण मला…

शेवटी विजय हा विजय असतो: हरमन

याप्रकरणी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली होती, 'हा खेळाचा भाग आहे, मला वाटत नाही की आम्ही काही नवीन केले आहे. हे त्या फलंदाजाची जागरूकता दर्शवते की फलंदाज काय करत आहे. मी माझ्या खेळाडूंना पाठिंबा देईन, त्यांनी नियमांच्या बाहेर काहीही केलेले नाही. दिवसाच्या शेवटी, विजय हा विजय असतो.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख