अ‍ॅपशहर

'ये प्यार-व्यार नहीं होता मुझसे...'; मोहम्मद शमीच्या बायकोचा VIDEO तुफान व्हायरल

Hasin Jahan Video : हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्याचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग आहे, असं तिने म्हटलं होतं.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2022, 12:32 pm
नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कधीकाळी मॉडेलिंग करणाऱ्या हसीन जहाँ हिचे इंस्टाग्रामवरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तिने नुकताच आणखी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला असून नेटिझन्सकडून या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mohammad Shami Wife Hasin Jahan
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ


हसीन जहाँ हिने इंस्टाग्रावर एक रील्स शेअर केलं असून त्यामध्ये एक मजेशीर डायलॉग म्हटला आहे. 'ये प्यार-व्यार नहीं होता मुझसे, लड़ाई करनी है तो बोलो,' असं हसीन जहाँ हिने रील्समध्ये म्हटलं आहे. तिचे हे रील्स इंस्टाग्रामवर आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं असून अनेक जणांनी भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत. 'शमी भाई तर भांडण करून करून थकला' असा टोमणा युजर्सने कमेंटमधून मारला आहे.

View this post on Instagram A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial)


हसीन जहाँ आणि वादांची मालिका

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ हे २०१४ साली विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. मात्र संसाराला चार वर्ष झालेली असतानाच पती-पत्नीतील वाद चव्हाट्यावर आला. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. शमीचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध आहेत, त्याचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग आहे, असं तिने म्हटलं होतं. त्यानंतर आता दोघेही वेगळे राहतात.

दरम्यान, हसीन जहाँच्या आरोपांनंतर बीसीसीआयने मोहम्मद शमीवर कारवाई करत काही महिन्यांसाठी त्यांचं नाव सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हटवलंही होतं. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये शमी निर्दोष आढळला आणि त्याचं भारतीय संघात पुनरागमन झालं.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख