अ‍ॅपशहर

इंजेक्शन घेऊन उतरला होता WTC फायनल सामन्यात हा खेळाडू; आता घेतला मोठा निर्णय

kane williamson संघर्ष, त्याग आणि समर्पण याचे दुसरे नाव म्हणजे न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियमसन होय. गेल्या सहा महिन्यापासून तो दुखापतीशी लढत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2021, 12:57 pm
नवी दिल्ली: इंग्लंडमधील साउदम्प्टने येथे झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंड संघाने भारताचा ८ विकेटनी पराभव केला. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात एक खेळाडू असा होता जो इंजेक्शन घेऊन मॅच खेळत होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम WTC फायनल


वाचा- लाजिरवाण्या विक्रमातून भारतीय संघाची झाली सुटका; या संघाने टीम इंडियाला मागे टाकले

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन गेल्या सहा महिन्यांपासून हाताच्या कोपरच्या दुखापतीचा त्रास होतोय. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यामुळेच तो खेळू शकला नव्हता. पण भारताविरुद्धच्या WTC फायनलमध्ये मात्र तो इंजेक्शन घेऊन सामना खेळत होता. वर्ल्ड टेस्टच्या चॅम्पियनशिप फायनलनंतर तो इंग्लंडमध्ये असून तो मेंटर म्हणून बर्मिंघम फिनिक्स संघा सोबत थांबू शकतो.

वाचा- चॅम्पियन झाल्यावर विराटच्या खांद्यावर डोक का ठेवले? केन विलियमसनने केला खुलासा

दुखापतीमुळे केनने आता हंड्रेड क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सत्रातून नाव मागे घेतले आहे. विलियमसनने फिनिक्स संघासोबत १ लाख १० हजार डॉलरचा करार केलाय.

वाचा- रोहित शर्माने ५.२५ कोटींना पुण्याजवळचा बंगला विकला; या व्यक्तीने खरेदी केली प्रॉपर्टी

भारताविरुद्धच्या फायनल सामन्यात मैदानात उतरण्याआधी केन विलियमसनने इंजेक्शन घेतले होते. या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४४ तर दुसऱ्या डावात ८९ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी विजयासाठी १३९ धावांची गरज असताना दोन विकेट पडल्यानंतर केनने रॉस टेलर सोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ९६ धावांची भागिदारी केली होती.

महत्वाचे लेख