अ‍ॅपशहर

IND vs NZ तिसरी वनडे: पावसामुळे मॅच थांबली, DLS लागू झाल्यास भारत सामना जिंकेल का?

New Zealand vs India: टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात तिसरी वनडे क्राइस्टचर्च येथे सुरू आहे. भारताने न्यूझीलंडसाठी २२० धावांचे लक्ष्य दिले आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2022, 2:13 pm
क्राइस्टचर्च: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची वनडे सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजीकरत न्यूझीलंडसमोर २२० धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडने १८ षटकात १ बाद १०४ धावा केल्या असून सध्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain


डकवर्थ लुईस अर्थात DLS नियम लागू करण्यासाठी अजून २ ओव्हरची गरज आहे. जर पावसाने विश्रांती घेतली आणि दोन षटकांचा खेळ झाला तर न्यूझीलंडला DLS च्या नियमानुसार सुधारित लक्ष्य दिले जाऊ शकते. सध्या न्यूझीलंडचा संघ DLSच्या नियमानुसार ५० धावांनी पुढे आहे. याचाच अर्थ न्यूझीलंडला फक्त १२ चेंडू खेळून काढायचे आहेत. मात्र त्यासाठी पाऊस थांबला पाहिजे आणि दोन ओव्हरचा खेळ झाला पाहिजे. जर दोन ओव्हरचा खेळ झाला नाही म्हणजे २० षटके झाली नाही तर मॅच रद्द होईल.

वाचा- PAK vs ENG: अज्ञात व्हायरसचा हल्ला; पाकिस्तानात पोहोचताच इंग्लंडच्या १४ खेळाडू पडले आजारी


वाचा- सून मयंतीमुळे अडचणीत आले BCCIचे अध्यक्ष; रॉजर बिन्नी यांना नोटीस

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत न्यूझीलंडने जिंकली होती. दुसरी लढत पावसामुळे रद्द झाली. भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. पण सध्याची परिस्थिती भारताच्या बाजूने असल्याचे दिसत नाही. आता देखील मॅच रद्द झाली किंवा DLSचा नियम लागू झाला तरी न्यूझीलंडचा फायदाच आहे. कारण दोन्ही परिस्थितीत मालिकेत त्यांचाच विजय निश्चित आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज