अ‍ॅपशहर

IND vs NZ : बदला घ्यायचे मनातसुद्धा नाही- विराट कोहली!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्याआधी हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध लढले होते. वर्ल्ड कपमधील सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2020, 1:27 pm
ऑकलंड: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्याआधी हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध लढले होते. वर्ल्ड कपमधील सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचे वर्ल्ड जिंकण्याचे स्वप्न त्यामुळे भंगले होते. उपांत्य फेरीतील लढतीनंतर दोन्ही संघ प्रथमच सामना खेळत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat-kohli


उपांत्य फेरीतील न्यूझीलंडकडून झालेला पराभव भारताच्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवाबद्दल बोलताना विराटने वर्षातील तो एक सामना वगळता सर्व काही सर्वोत्तम झाल्याचे म्हटले होते. तर हिटमॅन रोहित शर्माने देखील २०१९ वर्ष सर्वोत्तम असे होते. पण वर्ल्ड कप न जिंकल्याचे दु:ख असल्याचे सांगितले होते.

वाचा- जेव्हा मुंबईचा संघ गुजराती बोलायचा; गावस्करांनी सांगितला गंमतीशीर किस्सा!

भारतीय संघ न्यूझीलंडकडून झालेल्या त्या पराभवाची परतफेड करणार असेच सर्वांना वाटते. यासंदर्भात भारताचा कर्णधार विराट कोहलीला विचारले असता त्याने मात्र वेगळे उत्तर दिले. न्यूझीलंड दौऱ्यात त्या पराभवाची परतफेड करण्याचे माझ्या ध्यानीमनीसुद्धा नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना एक आदर्श निर्माण करणारा भारतीय संघ आहे, असे विराटने सांगितले.

वाचा- विराट भडकला, एक दिवस थेट मैदानात लॅण्ड करावे लागेल!

असा आहे भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा

>> टी-२० मालिका (सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरू होणार)

पहिली टी-२० : ऑकलंड- २४ जानेवारी २०२०
दुसरी टी-२०: ऑकलंड- २६ जानेवारी २०२०
तिसरी टी-२०: हॅमिल्टन- २९ जानेवारी २०२०
चौथी टी-२०: वेलिंग्टन- ३१ जानेवारी २०२०
पाचवी टी-२०: माऊंट माउंगानुई- ०२ फेब्रुवारी २०२०

>> वनडे मालिका (सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरू होणार)

पहिली वनडे: हॅमिल्टन- ०५ फेब्रुवारी २०२०
दुसरी वनडे: ऑकलंड-०८ फेब्रुवारी २०२०
तिसरी वनडे : माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी २०२०

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना: हॅमिल्टन- १४ ते १६ फेब्रुवारी (भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता)

>> कसोटी मालिका (दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार पहाटे ४.०० वाजता सुरू होणार)

पहिली कसोटी: २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
दुसरी कसोटी: २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज