अ‍ॅपशहर

कसोटीआधीच भारताची पोलखोल; ८ फलंदाज फ्लॉप!

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यआधी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारताचा तीन दिवसांचा सराव सामना आजपासून सुरू झाला. या सामन्यात भारतीय संघाची पोलखोल झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2020, 2:04 pm
हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारताचा तीन दिवसांचा सराव सामना आजपासून सुरू झाला. या सामन्यात भारतीय संघाची पोलखोल झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prithvi-and-shubman


सराव सामन्यात भारताचे आठ फलंदाज अपयशी ठरले आहेत. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, सलामीवीर पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल आघाडीचे तिनही फलंदाजी सपशेल अपयशी ठरले. पृथ्वी आणि शुभमन शून्यावर बाद झाले. तर मयांक एक धाव करून माघारी परतला.

वाचा- अखेर पंतला भारतीय संघात दिली संधी; पाहा किती धावा केल्या

भारतासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला. आघाडीचे फलंदाज बाद झाले तेव्हा भारताची अवस्था ४ बाद ३८ अशी झाली होती.

कसोटीतील अनुभवी अजिंक्य रहाणे देखील १८ धावा करून बाद झाला. तर अनेक दिवसांनी संघात स्थान मिळालेला ऋषभ पंत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

वाचा- RCBचे विराटला उत्तर; प्रसिद्ध केला नवा लोगो!

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चार भारतीय फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही. तर चार जणांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. भारताच्या धावफलकाकडे पाहिल्यास विहारीने सर्वाधिक १०१ तर पुजाराने ९३ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अवांतर धावा (२६) होत्या. भारताचा संघ ७८.५ षटकात २६३ धावांवर बाद झाला.

वाचा- सेहवागने शेअर केले शहीदांच्या मुलांचे फोटो!

विहारीचे शतक

विहारीने १८२ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या. दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. तर अनुभवी पुजाराने २११ चेंडूत १ षटकार आणि ११ चौकारांसह ९३ धावा केल्या. त्याचे शतक ७ धावांनी हुकले. विहारीच्या या खेळीबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज