अ‍ॅपशहर

ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद मिळाल्यावर पॅट कमिन्सने का मानले झहीर खानचे आभार, जाणून घ्या...

गेल्या दोन वर्षांपासून पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे उपकर्णधारपद भूषवत आहे. पॅट कमिन्सला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा तितका अनुभव नाही. याआधी त्याने देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्सचे कर्णधारपद भूषवले होते.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 27 Nov 2021, 7:42 pm
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा नवा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. झहीरला पाहून मला एक वेगवान गोलंदाजही संघाचे नेतृत्व करू शकतो, अशी प्रेरणा मिळाली असे कमिन्सने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pat cummins recalls playing under zaheer khan as he prepares to lead australia in ashes
ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद मिळाल्यावर पॅट कमिन्सने का मानले झहीर खानचे आभार, जाणून घ्या...


पॅट कमिन्स २०१७ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाचा भाग होता. त्यावेळी दिल्ली संघाचा कर्णधार झहीर खान होता. जहीरच्या नेतृत्वात दिल्ली संघाने चांगली कामगिरी केली होती. पॅट कमिन्स म्हणाला की, झहीर खानला पाहिल्यानंतर मला वाटले की, वेगवान गोलंदाज हा कर्णधार होण्यात काही नुकसान नाही.'

झहीर खानने ज्या प्रकारे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्व केले, त्याचे पॅट कमिन्सने कौतुक केले. पर्थ नाऊने दिलेल्या बातमीनुसार, कमिन्स म्हणाला की, 'टी-२० मधील जहीरचे नेतृत्व मला खूप आवडले. त्याने उत्कृष्ट पद्धतीने संघाचे नेतृत्व केले. त्याच्याकडे गोलंदाजीच्या खूप कल्पना होत्या आणि तो मला मैदानात क्षेत्ररक्षणाची मांडणी करण्यात आणि रणनीती बनवण्यात खूप मदत करत असे. मला त्याचा खूप फायदा झाला. वेगवान गोलंदाजाचे कर्णधार बनण्यात काही नुकसान नाही, असे मला वाटत नाही.'

दरम्यान, टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलिया कसोटी संघाच्या कर्णधारपदी, तर स्टीव्ह स्मिथची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रिची बेनॉडनंतर पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कर्णधार असणारा पहिला वेगवान गोलंदाज असेल.

महत्वाचे लेख