अ‍ॅपशहर

आता तरी संघात घेणार का? टीम इंडियाच्या सलामीवीराचे धमाकेदार शतक; फक्त १० चेंडूत केल्या ५० धावा

Devdutt Padikkal: भारतीय क्रिकेट संघाकडून फक्त दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कर्नाटकच्या देवदत्त पडिक्कलने रणजी ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2023, 4:32 pm
नवी दिल्ली: भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीच्या लढती सुरू आहेत. या स्पर्धेत एकापेक्षा एक शानदार कामगिरी पाहायला मिळत आहे. मग ती फलंदाजीत असो की गोलंदाजीत, भारतीय संघातून सध्या बाहेर असलेल्या एका फलंदाजाने अशी खेळी केली आहे ज्यामुळे निवड समितीला देखील त्याच्या नावाचा विचार करावा लागले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devdutt padikkal


रणजी ट्रफीच्या ग्रुप सी मध्ये झारखडंविरुद्धच्या सामन्यात देवदत्त पडिक्कलने वादळी फलंदाजी केली. त्याने १७५ चेंडूत ११४ धावा केल्या. यात ५ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकने ही मॅच ९ विकेट जिंकली.

वाचा- पृथ्वी शॉपेक्षा धोकादायक आहे हा कोहली; फक्त गोलंदाजांची धुलाई नाही तर विकेट देखील घेतो

देवदत्तने ११४ धावांमध्ये ५८ धावा या चौकार आणि षटकारांच्याद्वारे केल्या. चेंडूच्या विचार करता त्याने फक्त १२ चेंडूत ५८ धावा केल्या. तर १० चेंडूत ५० धावा केल्या. देवदत्तच्या अशा स्फोटक खेळीमुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने फक्त २ सामने खेळले आणि त्यात त्याने ३८ धावा केल्या आहेत. २९ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. सध्या तो टीम इंडियाच्या बाहेर असला तरी या धमाकेदार कामगिरीमुळे देवदत्तने पुन्हा एकदा टीम इंडियाचे दार ठोठावले आहे.

वाचा- मेहा पटेलच्या फिरकीत अडकला भारताचा गोलंदाज; आज होणार विवाह, पाहा संगीत सोहळ्यातील व्हिडीओ

आयपीएलमध्ये देवदत्त रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळत होता. आरसीबीकडून देवदत्त विराट कोहली सोबत सलामीला यायचा. नंतर त्याला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले. आरआर कडून देवदत्तला सलामीला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये ४६ सामन्यात त्याने १ हजार २६० धावा केल्या आहेत.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख