अ‍ॅपशहर

रवींद्र जडेजाला मस्ती नडली... क्रिकेट खेळताना नाही तर कशामुळे झाली दुखापत, जाणून घ्या सत्य...

T20 world Cup 2022 : रवींद्र जडेजाला झालेली ही दुखापत क्रिकेटचा सराव करताना किंवा सामना खेळताना झालेली नाही. त्यामुळे बीसीआयने त्याला चांगलीच चपराक दिली आहे. जडेजाला ही दुखापत नेमकी कशी आणि कुठे झाली, याचं खरं कारण आता समोर आले आहे. जडेजाला कशी दुखापत झाली आणि बीसीसीआयने त्याला का फटकारले, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 13 Sep 2022, 6:36 pm
मुंबई : रवींद्र जडेजाला आता ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण जडेजाला झालेली ही दुखापत क्रिकेटचा सराव करताना किंवा सामना खेळताना झालेली नाही. त्यामुळे बीसीआयने त्याला चांगलीच चपराक दिली आहे. जडेजाला ही दुखापत नेमकी कशी आणि कुठे झाली, याचं खरं कारण आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T 20 world cup 2022
सौजन्य-ट्विटर


काही दिवसांपूर्वी जडेजाला दुखापत झाली होती आणि त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. या दुखापतीमधून सावरण्यासाठी जडेजाला मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो विश्वचषकात खेळणार नाही. पण आता जडेजाला दुखापत नेमकी कशी आणि कधी झाली, याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जडेजा हा काही दिवसांपूर्वी अ‍ॅडवेंचर अ‍ॅक्टिविटी करण्यासाठी गेला होता. या अ‍ॅक्टिविटीमध्ये जडेजाला स्की-बोर्डवर बॅलन्स करायचा होता. हा बॅलन्स करत असताना जडेजाला दुखापत झाली. ही दुखापत काही काळ त्याने कळवली नव्हती. पण जेव्हा जडेजा हा आशिया चषक खेळण्यासाठी आला तेव्हा ही कल्पना त्याने कोणाला दिली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे जडेजाला खेळवण्याच निर्णय भारतीय संघाने घेतला. जडेजा जेव्हा आशिया चषकातील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याची ही दुखापत अजून बळावली. पण तरीही त्याने ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. त्या नंतरही आपण दुसऱ्या सामन्यासाछी उपलब्ध असल्याचे त्याने संघ व्सवस्थापनाला कळवले. पुन्हा एकदा जडेजाने ही दुखापत पुन्हा एकदा लपवून ठेवली. त्यामुळे तो दुसरा सामनाही खेळला आणि त्यानंतर जडेजाला खेळणे अशक्य असल्याचे वाटायला लागले. त्यानंतर जडेजाने ही गोष्ट गंभीरपणे घेतली आणि त्यानंतर आपण शस्त्रक्रीया करायला हवी, असं त्याला वाटलं. त्यानंतर ही गोष्ट त्याने भारतीय संघाला कळवली आणि त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही गोष्ट जेव्हा बीसीसीआयला समजली तेव्हा त्यांनी बीसीसीआयला फटकारले. बीसीसीआय आणि निवड समिती यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली. त्यामुळेच जडेजाला थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावेली बीसीसीआयकडे जडेजाबाबत एक पर्याय खुला होता. जडेजाला ते फिटनेसच्या मुद्द्यावर भारतीय संघात घेऊ शकत होते. विश्वचषकापूर्वी जडेजाने फिटनेस टेस्ट पास केली तर त्याला संघात स्थान देऊ, असे बीसीसीआय किंवा निवड समितीला सांगता आले असते. पण जडेजाने यावेळी ही गोष्ट लपवल्यामुळे त्यावा बीसीसीआय आणि निवड समिती यांनी थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज