अ‍ॅपशहर

रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाने केले गंभीर आरोप

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर एका युवकाने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे, पण पंतच्या कुटुंबियांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2020, 4:05 pm
भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर एका युवकाने गंभीर आरोप केले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच नेमकं काय घडलंय ते सर्वासमोर येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rishabh pant


एका युवकाला पंतची आई आणि बहिण धमाकावत असल्याचे आता पुढे आले आहे. यासाठी पंतच्या आईने चक्क रिषभच्या नावाचाही वापर केला आहे. माझा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे, त्याचे सर्व अधिकारी ओळखीचे आहेत, असे या युवकाला पंतच्या आईने धमकावल्याचे समजत आहे.

वाचा- धक्कादायक! भारताचा विश्वविजयी क्रिकेटपटू करणार होता आत्महत्या

नेमके प्रकरण आहे तरी काय...
पंतच्या कुटुंबियांचे दिल्ली-हरीद्वार हायवेजवळ बेक टू बेस नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये हा युवक कुक म्हणून काम करत होता. या युवकाला ९, ५०० रुपये पगार देण्याचेही पंतच्या कुटुंबियानी ठरवले होते. फैज आलम, असे या कुकचे नाव आहे. फैजला या हॉटेलमध्ये डिसेंबरपर्यंत पगार मिळाला होता. पण त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचा पगार त्याला दिला नाही. त्यानंतर मार्च महिन्यात हॉटेल बंद करण्यात आले. या दोन महिन्यांचा पगार जेवव्हा फैजने मागितला तेव्हा त्याला पंतच्या आई आणि बहिणीने धमकावल्याचे वृत्त पुढे येत आहे.

वाचा-गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येमुळे विराट कोहली हळहळला....

याबाबत फैजने ३० मार्चला अल्पसंख्यांक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. पण अजूनही फैजला न्याय मिळाले नाही. फैजच्या एकट्याच्या जीवावर त्याचे घर सुरु आहे. फैजच्या वडिलांचे निधन झालेले आहे. घरामध्ये फैजबरोबर आई आणि दोन बहिणी राहतात. पंतच्या कुटुंबियांनी पगार न दिल्यामुळे फैजला घर चालवणे अवघड होऊन बसले आहे.

फैजने जे अल्पसंख्यांक आयोगाला पत्र पाठवले आहे, त्यानुसार पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत या प्रकरणात पंतच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. करोना व्हायरसमुळे पंत सध्या घरीच आहे. पंतला भारतीय संघने भरपूर संधी दिली, पण तो त्यामध्ये अपयशी ठरला. त्यामुळेच पंतला आपले भारतीय संघातील स्थान टिकवता आलेले नाही. आता विश्वचषकाच्या संघात तो असणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

(अमर उजाला या हिंदी वेबसाईटने हे वृत्त पहिल्यांदा प्रकाशित केले होते. या वृत्ताची जबाबदारी महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम घेत नाही.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज