अ‍ॅपशहर

रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं... सूर्याच्या आधी अक्षर पटेल फलंदाजीला का आला जाणून घ्या...

Rohit Sharma on Surya: अक्षर पटेलला सूर्याच्या आधी फलंदाजीला का पाठवलं, ही चर्चा जोरदार सुरु झाली होती. पण या चर्चेला पूर्णविराम भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिला आहे. पाचव्या स्थानी सूर्याला न पाठवता अक्षरला का पाठवले गेले, त्यामध्ये नेमकी कोणती रणनिती होती हे रोहित शर्माने आता स्पष्ट केल्याचे समोर आले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 Mar 2023, 6:15 pm
चेन्नई : तिसऱ्या वनडे सामन्यात जेव्हा लोकेश राहुल बाद झाला तेव्हा सर्वांनाच वाटले होते की, सूर्यकुमार यादव आता फलंदाजीला येईल. पण तसे घडले मात्र नाही. कारण सूर्याच्या जागी अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवले गेले आणि सर्वांनाच धक्का बसला. पण सूर्याच्या जागी अक्षर पटेलला फलंदाजीला का पाठवण्यात आले, याचे स्पष्टीकरण आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suryakumar yadav


पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये सूर्या सपशेल अपयशी ठरला होता. कारण पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे सूर्याला तिसऱ्या सामन्यात फलंदाजीला उशिरा पाठवले, असे काही जणं बोलत आहेत. तर सूर्यावर रोहितचा विश्वास नव्हता, पण त्याच्या शिवाय रोहितकडे पर्याय पण नव्हता, असे काही काही जणं बोलत आहेत. पण सूर्याला सातव्या क्रमाकांवर पाठवण्याचे हे कारण मात्र नक्कीच नाही. कारण रोहित शर्माने सूर्याला उशिरा का पाठवले गेले, याचे कारण आता सांगितले आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, " लोकेश राहुल आणि विराट कोहली हे जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा चेंडू चांगला फिरत होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एक लेग स्पिनर आणि एक डावखुरा फिरकीपटू आणला होता. त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजाला जास्त समस्या जाणवू शकली असती. विराट कोहली सेट झाला होता, पण त्याचवेळी आम्हाला महत्वाचे फलंदाज गमवायचे नव्हते. त्यामुळे आम्ही अक्षर पटेलसारखा डावखुरा फलंदाज आम्ही खेळायला पाठवला होता. कारण डावखुरा खेळाडू हा लेग स्पिनर आणि डावखुरा फलंदाज सहजपणे खेळू शकतो, त्यामुळे आम्ही पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेलला फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. भारताची तळाची फलंदाज अधिक बळकट व्हावी. हा आमचा खरा विचार होता. त्यासाठीच आम्ही तीन फिरकीपटू घेऊन खेळलो होतो. तळापर्यंत चांगली फलंदाजी चांगला करता यावी, हा त्यामागचा मुद्दा होता. त्यामुळेच फलंदाजीमध्ये काही बदल करण्यात आले होते."

सूर्यावर रोहितचा विश्वास नाही, ही गोष्ट खरी नाही. कारण जर रोहितला विश्वास नसला असता तर त्याने सूर्याला सामन्यात खेळण्याची संधीच दिली नसती.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख