अ‍ॅपशहर

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक; वर्ल्डकपच्या आधी सापडला विजयाचा X फॅक्टर

India Beat Sri Lanka To Win Odi Series: कुलदीप यादवची शानदार गोलंदाजी आणि केएल राहुलचे संयमी अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शानदार विजय मिळवला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2023, 5:19 pm
कोलकाता: गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममुळे केएल राहुलवर टीका होत होती अशात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने संयमी अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी संघात स्थान पक्के नसलेला कुलदीप यादवने ३ विकेट घेत श्रीलंकेला कमी धावसंख्येवर रोखले. या दोघांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दुसऱ्या वनडेसह मालिका देखील जिंकली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kuldeep yadav kl rahul


श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कुलदीप आणि मोहम्मद सिराज यांच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर भारताने लंकेला २१५ धावांवर रोखले. सामन्यात लंकेची अवस्था १ बाद १०२ अशी होती. त्यानंतर कुलदीप आणि सिराज यांनी कमाल करून दाखवली.

या वर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकप होणार आहे. ही स्पर्धा भारतातच आहे. टीम इंडियासाठी ही एक चांगली बाब आहे. भारतीय फिरकीपटू २०२२ नंतर मधल्या ओव्हरमध्ये फार प्रभावी दिसले आहेत. २०१९ च्या वनडे वर्ल्डकप ते २०२१पर्यंत भारतीय फिरकीपटूंनी दुसऱ्या पॉवर प्ले (११-४०) मध्ये ३९ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्यांची सरासरी ५२.९ इतकी होती. २०२२च्या सुरुवातीला भारतीय फिरकीपटूंनी घातक गोलंदाजी केली आहे. त्यांनी ५६ विकेट घेतल्या आणि सरासरी ३२.४ अशी होती. यात कुलदीप यादवची भूमिका महत्त्वाची राहिली, त्याने ९ डावात २३.५च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या.

वाचा- भारतीय संघात १००, २०० आणि ३०० करणाऱ्यांना संधी का मिळत नाहीय; समोर आलं मोठं सत्य

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत कुलदीपने ५ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर देखील दुसऱ्या कसोटीत तो संघाबाहेर झाला. गुरुवारी युजवेंद्र चहल दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने कुलदीपला संधी मिळाली आणि त्याने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली.

दुसऱ्या बाजूला श्रीलंकेने भारताला दिलेले लक्ष्य फार मोठे नव्हते. पण ८६ धावांवर भारताने ४ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर राहुलने हार्दिक पंड्यासोबत डाव संभाळला. या दोघांनी ७५ धावांची भागिदारी केली आणि विजयाच्या जवळ पोहोचवले. पावच्या क्रमांकावर राहुलने याआधी देखील खुप चांगली फलंदाजी केली आहे. त्याने वनडेत पाचव्या क्रमांकावर १५ डावात सात वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. या क्रमांकावर त्याची सरासरी ५३.१ इतकी आहे.

वाचा- पुण्यातील मॅच झाली आणि कोच द्रविड यांनी थेट मराठीत बोलायला केली सुरुवात, पाहा व्हिडिओ

या दोन्ही महत्त्वाच्या खेळाडूंचा फॉर्म भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरणार आहे. वर्ल्डकप याच वर्षी भारतात असल्याने दोघेही विजयात महत्त्वाची भूमीका पार पाडू शकतील.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख