अ‍ॅपशहर

रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षक जखमी; नाकाचे हाड झाले फॅक्चर

Rohit Sharma Six: भारताचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात एक षटकार मारला. त्याच्या या षटकाराने मैदाना उपस्थित असलेल्या चाहत्याला दुखापत झाली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2022, 1:15 pm
बेंगळुरू: क्रिकेटमध्ये फक्त खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना देखील अलर्ट रहावे लागते. जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज षटकार मारतो तेव्हा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे-नाईट कसोटी दरम्यान झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने ६ बाद ८६ धावा केल्या होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रोहित शर्मा षटकार
Rohit Sharma Six: भारत विरुद्ध श्रीलंका दुसरी कसोटी


भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माने एक षटकार मारला. रोहित षटकार मारताना पाहून चाहत्यांना आनंद झाला असला तरी मैदानावर एका प्रेक्षकासाठी धोकादायक ठरले. रोहितच्या षटकारामुळे प्रेक्षकाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. रोहितने डावाच्या सहाव्या षटकात फर्नांडोच्या शॉर्ट चेंडूवर डीप मिड विकेटच्या वरून षटकार मारला. रोहितने कडक शॉट मारला होता. कारण पुल शॉट मारण्यात त्याचा कोणी हात धरु शकत नाही. अधिक तर वेळा रोहितने मारलेल्या अशा शॉटवर षटकार मिळतो. लंकेविरुद्ध देखील असेच झाले. त्याने मारलेला चेंडू प्रेक्षकांच्या दिशेने गेला.



रोहितने मारलेला चेंडू सामना पाहण्यासाठी आलेला चाहता २२ वर्षीय गौरव विकास परवार याच्या चेहऱ्याला लागला आणि त्याच्या नाकाचे हाडामध्ये हेअरलाइन फ्रॅक्चर झाले. अर्थात त्याची वैद्यकीय रिपोर्टनुसार तो फिट आहे. चेंडू लागल्यानंतर त्याच्यावर प्रथम कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या मेडिकल टीम उपचार केले आणि मग एका रुग्णालयात नेण्यात आले. त्याला टाके लागलेत. त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना भाऊ राजेश म्हणाला, डॉक्टरांनी काही दिवासंनी टाके काढण्यास सांगितले आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने २५ चेंडूत १५ धावा केल्या. यात १ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज