अ‍ॅपशहर

ऋतुराज गायकवाडचे विक्रमी शतक; नाबाद २२० नंतर केली पुन्हा एकदा वादळी खेळी

Ruturaj Gaikwad: सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये धमाकेदार शतक झळकावले. या स्पर्धेतील गेल्या ९ डावातील हे त्याचे ६वे शतक ठरले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2022, 5:51 pm
नवी दिल्ली: विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा धमाका केला. आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने १२५ चेंडूत १६८ धावा केल्या. यात १४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ruturaj Gaikwad


याआधी ऋतुराजने क्वार्टरफायनल मॅचमध्ये ऋतुराजने एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारले होते आणि २२० धावांची खेळी केली होती. सेमीफायनल लढतीत ऋतुराजला द्विशतक करता आले नाही पण त्याने गोलंदाजांची धुलाई मात्र केली. या सामन्यात ऋतुराजने १३३.३३च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने फक्त ८८ चेंडूत शतक पूर्ण केले.

वाचा- PAK vs ENG: अज्ञात व्हायरसचा हल्ला; पाकिस्तानात पोहोचताच इंग्लंडचे १४ खेळाडू...

विजय हजारे स्पर्धेच्या या हंगामात ऋतुराजने ९ डावात ६ शतक आणि १ द्विशतक केले आहे.

२०२१पासून विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराजची कामगिरी

११२ चेंडूत १३६ धावा
१४३ चेंडूत नाबाद १५४ धावा
१२९ चेंडूत १२४ धावा
१८ चेंडूत २१ धावा
१३२ चेंडूत १६८ धावा
१२३ चेंडूत नाबाद १२४ धावा
४२ चेंडूत ४० धावा
१५९ चेंडूत नाबाद २२० धावा
१२६ चेंडूत १६८ धावा

वाचा- IND vs NZ तिसरी वनडे: पावसामुळे मॅच थांबली, DLS लागू झाल्यास भारत सामना...

गेल्या सामन्यात ऋतुराजने उत्तर प्रदेशविरुद्ध २२० धावांची वादळी खेळी केली होती. यात त्याने गोलंदाज शिव सिंहच्या एका ओव्हरमध्ये ४३ धावा केल्या होत्या, यात ७ षटकारांचा समावेश होता. ऋतुराजच्या आधी २०१८ साली फोर्ड ट्रॉफीत नार्दर्न डिस्ट्रिक्ट्सकडून ब्रेट हॅम्पटन आणि जो कार्टर यांनी एका ओव्हरमध्ये इतक्या धावा केल्या होत्या.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख