अ‍ॅपशहर

विराट कोहली-सौरव गांगुली वादात मांजरेकर यांची उडी; गांगुलीबाबत म्हणाले...

दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत विराट कोहलीने निवडकर्त्यांना मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नको होते. संघ जाहीर होण्याच्या दीड तास आधी आपल्याला याची माहिती देण्यात आल्याचे सांगितले.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 23 Dec 2021, 6:44 pm
मुंबई : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वादावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. मांजरेकर म्हणाले की, कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याची पद्धत योग्य नव्हती. या संपूर्ण घडामोडीत मुख्य निवडकर्त्याने पुढे यायला हवे होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay manjrekar on virat kohli and sourav ganguly conflict said chairman of selector should deal
विराट कोहली-सौरव गांगुली वादात मांजरेकर यांची उडी; गांगुलीबाबत म्हणाले...


मांजरेकर यांनी दिले अझरुद्दीनचे उदाहरण
मांजरेकर यांनी टाइम्स नाऊशी बोलताना सांगितले की, 'भारतीय क्रिकेट प्रशासनात निवड समितीचे अध्यक्ष ही खूप महत्त्वाची भूमिका असते, पण त्यांना जे महत्त्व मिळायला हवे होते, ते मिळत नाही. निवड समितीच्या अध्यक्षाकडे इतके अधिकार आहेत की, ते भारतीय क्रिकेटचे चित्र आणि दिशा बदलू शकतात. राजसिंह डुंगरपूर यांचे उदाहरण देताना मांजरेकर म्हणाले की, डुंगरपूर यांनी अझरुद्दीनला कर्णधार बनवून भारतीय क्रिकेट बदलून टाकले. त्या संघाला ९० च्या दशकातील संघ म्हटले जायचे,'' असे म्हणत गांगुलीला चिमटा काढला.

हा मुद्दा असायला हवा होता
कायद्यानुसार पाहिले तर सौरव गांगुली विरुद्ध विराट कोहली ऐवजी विराट कोहली विरुद्ध चेतन शर्मा (मुख्य निवडकर्ता) असा मुद्दा असायला हवा होता. ते योग्य राहिले असते. जर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी यावर आपले मत मांडले असते, तर हा योग्य मार्ग ठरला असता.

मी गांगुली-विराटला नीट ओळखत नाही
या संपूर्ण प्रकरणात तुम्ही कोणाला योग्य मानता, असे विचारले असता मांजरेकर यांनी थेट उत्तर देण्यास नकार दिला. ते म्हणाला की, मी विराट आणि गांगुलीला नीट ओळखत नाही आणि त्यामुळे कोणाची चूक आहे आणि कोण काय म्हणाले? हे सांगू शकत नाही.

हा मुद्दा आता संपला
मांजरेकर यांनी त्यांच्या मते हा मुद्दा आता संपल्याचेही सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका लवकरच सुरू होणार असून, अशा स्थितीत संघाचे लक्ष त्याकडेच असेल. विराट कोहली आता त्यापुढे गेला आहे. दक्षिण आफ्रिकेत लवकरच कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता दोन्ही पक्ष काही बोलतील असे वाटत नाही, असेही मांजरेकर म्हणाले.

महत्वाचे लेख