अ‍ॅपशहर

गांगुलीने केली २० हजार गरजूंच्या भोजनासाठी मदत

गांगुली यांनी २ हजार किलो तांदुळ एका संस्थेला दान केला होता. त्यानंतर आता गांगुली पुन्हा एकदा २० हजार लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. गांगुली यांचा आदर्श भारतीय खेळाडूंनीही घ्यायला हवा, अशी चर्चा चाहते करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2020, 1:41 pm
भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे २० हजार गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. यापूर्वी गांगुली यांनी २ हजार किलो तांदुळ एका संस्थेला दान केला होता. त्यानंतर आता गांगुली पुन्हा एकदा २० हजार लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saurav


सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये काही लोकं शाळा, महाविद्यालये किंवा अन्य सार्वजनिक स्थळी राहत आहेत. त्याचबरोबर या काळात बऱ्याच जणांना रोजगारही नाही. या गरजू लोकांसाठी गांगुलीने आज दोन हजार किलो तांदूळ दिले होते.


सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी गांगुली आता थेट रस्त्यावर उतरला आहे.

गांगुलीने आता २० हजार गरजू लोकांना जेवण देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार गांगुली आता २० लोकांना जेवण देण्यासाठी पुढे आला आहे. गांगुलीने यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय केल्याचे पाहायला मिळाले. तोंडाला मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून गांगुली लोकांना मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ४९भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, झहीर खान, पीव्ही सिंधू, विश्वनाथन आनंद, हिमा दास, नीरज चोप्रा, मेरी कोम, विनेश फोगट, मनु भाकर या काही खेळाडूंचा समावेश होता.

या संवादाबाबत सौरव गांगुली म्हणाले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या महत्वाच्या आजी-माजी खेळाडूंबरोबर संवाद साधला. पण या संवादामध्ये नेमके त्यांनी आम्हाला काय सांगितले हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मोदी यांनी आम्हाला जे काही सांगितले त्या गोष्टी नक्कीच मी करणार आहे. कारण या गोष्टींमुळे देशालाच फायदा होणार आहे."

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज