अ‍ॅपशहर

करोनापेक्षा मोठा व्हायरस मोदींच्या डोक्यात आहे, आफ्रिदीचा व्हिडीओ व्हायरल...

सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे, असे आफ्रिदी म्हणाला. या व्हिडीओमध्ये आफ्रिदी पाकिस्तानच्या सैन्याबरोबर आहे. आपल्या सैन्याचे कौतुक करत असताना आफ्रिदी मोदी यांच्यावर घसरल्याचे पाहायला मिळाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2020, 7:26 pm
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर आज जोरदार टीका केली होती. ही टीका करताना आफ्रिदीची जीभ घररल्याचेही पाहायला मिळाले. करोनापेक्षा मोठा व्हायरस मोदींच्या डोक्यात आहे, असे वक्तव्य यावेळी आफ्रिदीने केले आहे. आफ्रिदीच्या वक्तव्यचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम afridi on modi


या व्हिडीओमध्ये आफ्रिदी पाकिस्तानच्या सैन्याबरोबर आहे. आपल्या सैन्याचे कौतुक करत असताना आफ्रिदी मोदी यांच्यावर घसरल्याचे पाहायला मिळाला आहे. मोदींवर जोरदार टीका करताना ते डरपोक आहेत, असेही आफ्रिदी म्हणाला आहे.

या व्हिडीओमध्ये आफ्रिदी म्हणाला की, " सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे." बॉलीवूडमधील सिनेमा निर्माते अशोक पंडीत यांनी आफ्रिदीचा व्हिडीओ शेअर केला आहे.



गंभीर आणि हरभजन यांचा आफ्रिदीवर हल्लाबोल...
भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने आफ्रिदीला चांगलेच खडसावले होते. गंभीर म्हणाला की, " पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी एवढी आहे, तर त्यांच्याकडे सात लाखांचे सैन्य आहे. तुम्ही गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहेत. भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे आफ्रिदी आणि इम्रान खान हे जोकर आहेत. कारण ते पाकिस्तानच्या लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचबरोबर ते मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा तुम्हाला काश्मीर मिळणार नाही. तुम्हाला बांगलादेश लक्षात आहे ना? "

हरभजननेही आता आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला आहे. हरभजन म्हणाला की, " यापूर्वी आफ्रिदीला मी माझा मित्र समजत होतो. त्यामुळे त्याच्याशी संवाद होत होता. पण आता भारत आणि मोदी यांच्यावर टीका केल्यावर त्याचे आणि माझे सर्व संबंध संपले आहेत. मोदींवर टीका करण्याचा अधिकार आफ्रिदीला कोणी दिला..."

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज