अ‍ॅपशहर

Shikhar Dhawan Record: कर्णधार असावा तर असा... शिखर धवनने पहिल्याच सामन्यात मोडला रोहित शर्माचा विक्रम

Shikhar Dhawan Broke Rohit Sharma's Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात धवनने दमदार फटकेबाजी केली. धवनने यावेळी शुभमन गिलबरोबर संघाला ११९ धावांची दमदार सलामी दिली. त्याचबरोबर धवनने धमाकेदार फटकेबाजी करत अर्धशतकही पूर्ण केले. या अर्धशतकासह धवनने आता रोहित शर्मालाही पिछाडीवर टाकले आहे. पहिल्याच सामन्यात धवनने दमदार कामगिरी केली. धवनने या सामन्यात रोहितला कसे मागे टाकले, जाणून घ्या....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 Jul 2022, 11:16 am
पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय संघाचे कर्णधारपद स्विकारल्यावर शिखर धवनने दमदार फलंदाजी केली आहे. कर्णधार कसा असावा याचा उत्तम वस्तुपाठ त्याने क्रिकेट जगतापुढे ठेवला आहे. त्याचबरोबर धवनने आता रोहित शर्माचा एक विक्रम मोडीत काढला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shikhar Dhawan
शिखर धवन (सौजन्य-ट्विटर)


वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात धवनने दमदार फटकेबाजी केली. धवनने यावेळी शुभमन गिलबरोबर संघाला ११९ धावांची दमदार सलामी दिली. त्याचबरोबर धवनने धमाकेदार फटकेबाजी करत अर्धशतकही पूर्ण केले. या अर्धशतकासह धवनने आता रोहित शर्मालाही पिछाडीवर टाकले आहे. या सामन्यापूर्वी धवनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या १४ सामन्यांमध्ये ३४८ धावा केल्या होत्या. यामध्ये एकही शतक नव्हते. दुसरीकडे रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आतापर्यंतच्या १४ वनडे सामन्यांमध्ये ४०८ धावा केल्या होत्या. या सामन्यात जेव्हा धवनने ६१ धावा पूर्ण केल्या, तेव्हा वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण त्याच्या ४०९ धावा झाल्या आणि त्याने रोहित शर्माला पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीने १५ सामन्यांमध्ये ७९० धावा केल्या होत्या. पण या मालिकेसाठी विराट कोहलीने बीसीसीआयकडे विश्रांती मागितली होती. विराट सध्या पॅरीसमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद लुटत आहे. दुसरीकडे रोहित शर्माही या वनडे मालिकेत खेळत नाही. कारण रोहितला ट्वेन्टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून वनडे मालिकेपासून दूर ठेवण्यात येत आहे आणि त्याला जास्तीत जास्त ट्वेन्टी-२० सामने खेळायला देत आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

धवनने या सामन्यात आपल्या डावाची सुरुवात संयतपणे केली. पण एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र धवनने जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. धवनने चौकारांचा पाऊस पाडत धावा जमवल्या. त्यामुळे भारताला या सामन्यात चांगली सलामी मिळाली. धवन आणि गिल यांनी ११९ धावांची भागीदारी रचली. यामध्ये गिलच्या ६४ धावा होत्या. गिल बाद झाल्यावर धवनने दमदार फलंदाजी सुरु ठवत शतकाच्या दिशेने मार्गक्रमण केले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख