अ‍ॅपशहर

मैदानात पाऊल ठेवताच धवनचा विक्रम; मोडला ६२ वर्ष जुना रेकॉर्ड

SLvsIND : आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरवात झाली. या सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने एक मोठा विक्रम केलाय.

Lipi 18 Jul 2021, 4:53 pm
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावरील संघासोबत असल्याने शिखर धवनकडे या युवा खेळाडूंच्या संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले. मैदानात पाऊल ठेवताच गब्बर धवनने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शिखर धवन


वाचा- पहिल्या वनडे सामन्याचे live अपडेट पाहा

धवन ठरला सर्वाधिक वयाचा कर्णधार
भारत अ संघाचे नेतृत्व केलेल्या शिखर धवनकडे पहिल्यांदाच वरिष्ठ संघाची कमान सांभाळण्याची संधी मिळाली. 35 वर्ष 225 दिवस वय असताना त्याने राष्ट्रीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले. यासह धवन आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. यापूर्वी हेमू अधिकारी यांनी 1959 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती, त्यावेळी त्यांचे वय 39 वर्ष 190 दिवस होते.

वाचा- 'नॅशनल क्रश' झाली २५ वर्षांची; वनडेमध्ये द्विशतक करणारी पहिली भारतीय

सर्वाधिक वयात भारतीय संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू-
1) हेमू अधिकारी - 39 वर्ष 190 दिवस विरुद्ध वेस्ट इंडीज - दिल्ली 1959
2) वीनू मंकड - 39 वर्ष 264 दिवस विरुद्ध पाकिस्तान - ढाका, 1955
3) सीके नायडू - 36 वर्ष 238 दिवस विरुद्ध इंग्लंड - लॉर्ड्स 1932
4) विजय हजारे - 36 वर्ष 236 दिवस विरुद्ध इंग्लंड - दिल्ली 1951
5) नवाब ऑफ पटौदी सीनियर - 36 वर्ष 98 दिवस विरुद्ध इंग्लंड - लॉर्ड्स 1946
6) लाला अमरनाथ - 36 वर्ष 78 दिवस विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ब्रिस्बेन 1947 (कसोटी)



वाचा- SL vs IND: २०१८ नंतर भारतीय संघासोबत प्रथच असे घडणार

शनाका श्रीलंकेचा दहावा कर्णधार
गेल्या चार वर्षात श्रीलंकेने आतापर्यंत 10 कर्णधार बदलले आहेत. दासून शनाका हा लंकेचा दहावा कर्णधार ठरला आहे. धनंजय डीसिल्वा आणि वेगवान गोलंदाज दुशमंत चमिरा यांना वगळता शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आव्हान देऊ शकेल, असा एकही खेळाडू श्रीलंका संघात दिसत नाहीय.

वाचा- Video : राहुल द्रविड सरांच्या बॅटने झळकावलं द्विशतक; स्मृतीने सांगितला किस्सा

तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघात अनेक खेळाडूंवर बीसीसीआयचे पहिल्यापासून लक्ष आहे. आयपीएल आणि घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी या मालिकेत आपला ठसा उमटवला, तर त्यांना थेट वर्ल्ड कपची दारे उघडणार आहेत. स्वत: कर्णधार शिखर धवनला त्याची संघात निवड होईल की नाही, याची खात्री नसल्याने त्याच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. कारण सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी चारजणांमध्ये स्पर्धा असणार आहे.

वाचा- श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत मुंबई इंडियन्स संघातील ४ जणांना संधी

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघ :
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, (उपकर्णधार) दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकरिया.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज