अ‍ॅपशहर

आशिया कप २०२२साठीची मोठी अपडेट; गांगुली आणि जय शहा बैठकीसाठी जाणार

करोना व्हायरसमुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेली आशिया क्रिकेट काउंसीलची बैठक आता होणार असून या बैठकीत आशिया कप २०२२चे आयोजन कधी आणि कुठे करायचे याचा निर्णय होणार आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2022, 11:33 am
नवी दिल्ली: आशिया कप २०२२च्या आयोजनाबाबत घडामोडींना वेग आला आहे. या स्पर्धेचे कधी आणि कुठे आयोजन करावे यासाठी या आठवड्यात आशिया क्रिकेट काउंसील अर्थात ACCची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा भाग घेणार आहेत. करोनामुळे गेल्या वर्षी ही बैठक स्थगित करण्यात आली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आशिया कप २०२२
आशिया कप २०२२साठी बैठक


वाचा- BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये ; चूक केल्यास १ कोटीचा दंड आणि मॅच खेळण्यावर बंदी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ मार्च रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आशिया क्रिकेट काउंसिलची बैठक होणार आहे. या काउंसिलचे सदस्य देखील बैठकीस उपस्थित असतील. बैठकीत आशिया कपच्या आयोजनासह अन्य अनेक गोष्टींवर चर्चा होईल. बैठकीत आशिया खंडातील सर्व देश आणि ACC सदस्य बोर्डातील प्रतिनिधी भाग घेतील. आशिया कप २०२२ साठी श्रीलंकेला यजमानपद मिळू शकते. अर्थात अधिकृत याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. पण ऑक्टोबर २०२१मध्ये काउंसिलने जाहीर केल्यानुसार यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले आहे. याचे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तमावाचे संबंध होय. भारताने कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिलाय.

वाचा- रोहित, विराट वर्षभरात जितकी कमाई करतात तितकी हा खेळाडू ७ दिवसात कमावतो

आशिया क्रिकेट काउंसीलची स्थापना १९८३ मध्ये झाली होती. आशिया खंडातील देशांतील ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी वनडे अथवा टी-२० स्वरुपात खेळवली जाते. भारताने आतापर्यंत सर्वाधिक ७ वेला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर श्रीलंकेचा क्रमांक लागतो, त्यांनी ५ वेळा जेतेपद मिळवले आहे.

वाचा- ऋषभ पंतसाठी जडेजावर झाला अन्याय

आशिया कपचे विजेते

१९८४- भारत
१९८६- श्रीलंका
१९८८- भारत
१९९९/९१- भारत
१९९५- भारत
१९९७- श्रीलंका
२०००- पाकिस्तान
२००४- श्रीलंका
२००८- श्रीलंका
२०१०- भारत
२०१२- पाकिस्तान
२०१२- श्रीलंका
२०१६- भारत
२०१८- भारत
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख