अ‍ॅपशहर

करोनामुळे भारतीय क्रिकेटला ७०० कोटींचे नुकसान

क्रीडा जगतातील जवळपास सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामुळे भारताच्या क्रिकेटला जवळपास ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2020, 3:58 pm
करोना व्हायरसमुळे भारतामध्ये ३मेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. क्रीडा जगतातील जवळपास सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामुळे भारताच्या क्रिकेटला जवळपास ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cricke


करोना व्हायरसचा मोठा परीणाम खेळाचे साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांवरही झालेला पाहायला मिळतो आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये कुठेच क्रिकेट स्पर्धा सुरु नाहीत. त्यामुळे क्रिकेटचे साहित्य बनवणाऱ्या नामवंत कंपन्या बंद पडलेल्या पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत स्पर्धा सुरु होणार नाहीत तोपर्यंत या कंपन्ययांना ऑर्डर मिळणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पण त्यांच्याकडे या समस्येवर कोणतेही उत्तर नाही.

मार्च पासून मे महिन्यापर्यंत भारतात जास्त क्रिकेट खेळले जाते. त्यामुळे या कालावधीमध्ये जास्त क्रिकेटची उपकरणं विकत घेतली जातात. त्यामुळे काळात क्रिकेटच्या साहित्यांची सर्वाधिक विक्री होत असते. पण भारतामध्ये सध्याच्या घडीला लॉकडाऊन असल्यामुळे कोणतीही क्रिकेटची स्पर्धा सुरु नाही आणि या गोष्टीचा फटका क्रिकेट साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांना बसला आहे.

मार्च ते मे या कालामधीमध्ये खेळ आणि फिटनेस संबंधित कंपन्यांना चांगला फायदा होत असतो. पण सध्याच्या घडीला या कंपन्यांना जवळपास ७०० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. जोपर्यंत भारतामध्ये लॉकडाऊन उटून क्रिकेट सुरु होत नाही तोपर्यंत या कंपन्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन कधी उठणार, याकडे या कंपन्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

क्रिकेट साहित्य बनवणारी एसजी ही भारतातील एक मोठी कंपनी आहे. या कंपनीचे मालक पारस आनंद यांनी सांगितले की, " या उद्योगाला वर्षभरात दीड हजार करोड रुपये मिळत असतात. आपल्या उद्योगातील सर्वात चांगला काळ हा मार्च ते मे महिना असतो. पण सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन आहे आणि त्यामुळेच आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे."

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज