अ‍ॅपशहर

एक विजय आणि रोहितचे कर्णधारपद जाणार? सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले पाहा

Rohit Sharma Captaincy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी असे विधान केले आहे, ज्यामुळे आता रोहित शर्मा वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा कर्णधार नसणार, असे दिसून येत आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2023, 9:48 am
अहमदाबाद: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताची धडक यामुळे भारतीय क्रिकेट चाहते खूपच आनंदात आहेत. भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन करत ही ट्रॉफी भारतातच कायम ठेवली आहे. या विजयानंतर भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारताच्या कर्णधाराबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्याबाबत एक भविष्यवाणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sunil Gavaskar on captaincy of India


यंदाच्या वनडे विश्वचषकानंतर हार्दिककडे भारतीय संघाची कमान सोपवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, त्यासाठी कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला वनडे सामना जिंकावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या वनडेला मुकणार आहे. या सामन्यासाठी हार्दिकची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

विराटने पुन्हा काढली नितीन मेनन यांच्यासोबतच्या वादाची खपली; म्हणाला-मला लगेच Out दिलं असतं!
२९ वर्षीय हार्दिक या अष्टपैलू खेळाडूने इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मोसमात नवा संघ गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आणि संघाला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो याआधी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

हार्दिकचा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कर्णधारपदाचा रेकॉर्ड
सामने - ११
विजय - ८
पराभूत - २
अनिर्णित -१

नेमकं काय म्हणाले गावस्कर

गावस्कर एका शोमध्ये म्हणाले, 'गुजरात टायटन्स आणि त्यानंतर टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी त्याच्या कर्णधारपदाने मी खूप प्रभावित झालो आहे. मला विश्वास आहे की जर त्याने मुंबईतील पहिला (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे) सामना जिंकला तर २०२३ मध्ये विश्वचषक संपल्यानंतर तुम्ही भारताचा कर्णधार म्हणून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकता.' गावस्कर पुढे म्हणाले की मधल्या फळीत हार्दिकची उपस्थिती भारतासाठी महत्त्वाची असेल.

६ चेंडू, ८ धावा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये थरार, न्यूझीलंडने लास्ट बॉलवर केला श्रीलंकेचा गेम, पाहा VIDEO
"कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या इतर खेळाडूंसोबत सहज असतो, हे तुम्ही पाहिले असेलच. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवून तो परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळतो.", असंही गावस्कर म्हणाले.

ते म्हणाले, 'तो मधल्या फळीतील 'इम्पॅक्ट आणि गेम चेंजर खेळाडू ठरू शकतो. गुजरात संघासाठीही तो गरजेनुसार फलंदाजीसाठी पहिल्या फळीत येत असे. पुढे सांगताना माजी अनुभवी सलामीवीर म्हणाले, ‘तो एक असा खेळाडू आहे जो जबाबदारी घेण्यास तयार असतो. पुढे येऊन तो सांगचे नेतृत्त्व करत आहे. तो या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.गावसकर म्हणाले की, हार्दिकची कर्णधार शैली त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळी बनवते.'
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज