अ‍ॅपशहर

कोणी इतका काळ दूर राहू शकतो का? धोनीबद्दल प्रश्न

एकीकडे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंग धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकेल, असे म्हटले असले तरी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे धोनीच्या दीर्घकाळ भारतीय संघापासून दूर राहण्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2020, 11:45 am
नवी दिल्ली : एकीकडे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंग धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकेल, असे म्हटले असले तरी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे धोनीच्या दीर्घकाळ भारतीय संघापासून दूर राहण्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ms-Dhoni


वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यापासून धोनी भारतीय संघातून खेळलेला नाही. त्याबद्दल गावस्कर म्हणतात की, कोण एवढा दीर्घकाळ भारतीय संघातून खेळण्यापासून दूर राहील? गेल्यावर्षी जुलैमध्ये भारताला न्यूझीलंडकडून वर्ल्डकप उपांत्य फेरीत हार सहन करावी लागली होती. त्यानंतर धोनी भारतीय संघातून खेळलेला नाही. टी-२० वर्ल्डकपच्या संघातून धोनी खेळेल का, या प्रश्नावर गावस्कर म्हणतात की, याचे उत्तर धोनीच देऊ शकेल. भारतातर्फे खेळण्यापासून कोण स्वतःला दूर ठेवेल?त्यामुळे याचे उत्तर या प्रश्नातच लपले आहे.

वाचा- सचिनला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन

धोनी गेल्या वर्षी ९ जुलै रोजी भारताकडून खेळला होता. त्यानंतर तो प्रदीर्घ विश्रांतीवर आहे. धोनीच्या या विश्रांतीमुळे त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चाना उधाण आले आहे. या वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करणार असल्याचे धोनीने सांगितले आहे.

चार दिवसांच्या कसोटीबद्दल म्हणाले..

आयसीसीकडून चार दिवसांच्या प्रस्तावाबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले, मला काय वाटते हे महत्त्वाचे नाही. खेळाडूंचे मत महत्त्वाचे आहे. यावर निर्णय घेण्याआधी सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे मत विचारात घ्यावे. बीसीसीआयने देखील क्रिकेटपटूंशी चर्चा करून निर्णय घ्यावा.

हे देखील वाचा-
धोनीला मागे टाकणारा विकेटकीपर; पाहा Video
सचिनला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज