अ‍ॅपशहर

'करोना'च्या प्रकोपानंतर टी-२० विश्वचषकाचे अपडेट

करोना व्हायरस बऱ्याच क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषकही रद्द होणार की पुढे ढकलला जाणार, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आयसीसीने याबाबत आता एक महत्वाचे अपडेट दिले आहे. या अपडेटमध्ये ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 7:43 pm
करोना व्हायरसचा विपरीत परीणाम काही क्रीडा स्पर्धांवर पाहायला मिळत आहे. बरेच दौरे आता रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही महत्वाच्या स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता तर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत खास अपडेट आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T-20 World Cup


करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा ही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलनंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटशी निगडीत सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे विश्वचषक. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर आणि १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. पण ही स्पर्धा होणार की पुढे ढकलली जाणार, याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मोठी अपडेट दिली आहे.



भारताने २००७ साली झालेली पहिली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. पण त्यानंतर भारताला एकदाही ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे भारतासाठी ही फार मोठी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे.

भारतासाठी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ही फार महत्वाची आहे. त्यामुळे या विश्वचषकाच्या आधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटची मालिका खेळणार आहे. या मालिकेचा भारतीय संघाला विश्वचषकासाठी फायदा होईल, असे म्हटले जात आहे.

आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यावर आता ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार का, याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चाहत्यांसाठी खास अपडेट दिले आहेत

आयसीसीने आपल्या चाहत्यांना कळवले आहे की, ट्वेन्टी-२० विश्वचषक ही स्पर्धा नियोजित वेळेतच घेण्याचा आमचा मानस आहे आणि ही स्पर्धा नियोजित वेळेतच होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज