अ‍ॅपशहर

निर्णायक तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना हा मँचेस्टरमध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी ५.३० वाजता नाही तर दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे.​​​ या मालिकेत भारत आणि इंग्लंड यांची १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे मँचेस्टरच्या मैदानात जो तिसरा वनडे सामना होणार आहे तो निर्णायक ठरणार आहे. कारण हा सामना जो जिंकेल, त्याला मालिका जिंकता येणार आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 17 Jul 2022, 12:47 pm
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण या मालिकेत भारत आणि इंग्लंड यांची १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे मँचेस्टरच्या मैदानात जो तिसरा वनडे सामना होणार आहे तो निर्णायक ठरणार आहे. कारण हा सामना जो जिंकेल, त्याला मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करतील. पण त्यासाठी आता भारतीय संघात दोन मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND VS ENG 3RD ODI
भारतीय संघ (सौजन्य-ट्विटर)


पहिला बदल
भारतीय संघाने आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी दिली होती, पण या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या लढतीत वेगवान गोलंदाजीचा पोषक वाताववरण होते, पण तरीही त्याला छाप पाडता आली नव्हती. दुसऱ्या वनडेमध्ये प्रसिध हा भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळेच त्याला रोहित शर्माने पूर्ण १० षटकेही टाकायला दिली नाहीत. प्रसिधने ८ षटकांमध्ये ५३ धावा देत एक विकेट मिळवला होता. त्यामुळे आता तिसऱ्या वनडेमध्ये नक्कीच त्याला संघाबाहेर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रसिधच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपला संघात स्थान मिळू शकते किंवा मोहम्मद सिराजलाही यावेळी संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी हा पहिला बदल भारतीय संघात होऊ शकतो.

दुसरा बदल
गेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने रवींद्र जडेजाला संघात संधी दिली आहे. पण या संधीचे सोने मात्र त्याला करता आलेले नाही. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना जडेजाला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याचबरोबर फलंदाजी तेव्हा भारतीय संघाला गरज होती तेव्हाही जडेजाला चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजा दुसऱ्या वनडे सामन्यात २९ धावा करू शकला आणि लायम लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. त्यामुळे आता तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात त्याला वगळण्यात येऊ शकते. जडेजाच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. कारण इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरण असते, त्याचबरोबर शार्दुल हा उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे जडेजाच्या जागी आता शार्दुलला तिसऱ्या वनडेमध्ये स्थआन मिळू शकते, असे दिसत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना हा मँचेस्टरमध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी ५.३० वाजता नाही तर दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख