अ‍ॅपशहर

टीम इंडियाला फायनल न खेळताही मिळाली होती आशिया चषकाची ट्रॉफी, पाहा नेमकं काय घडलं होतं

Team India : ही गोष्ट घडली होती ती १९८४ साली. भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारताचे कर्णधार कपिल देव होते. पण ज्यावेळी आशिया चषक १९८४ साली खेळवण्यात आला त्यावेली सुनील गावस्कर हे भारताचे कर्णधार होते. या वर्षी झालेल्या स्पर्धेत तीन संघांचाच समावेश होता. यामध्ये भारतासह पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ होते.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 11 Aug 2022, 7:29 pm
नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेत एकदा फायनल न खेळताही भारताला जेतेपद मिळाले होते. क्रिकेट चाहत्यांना कदाचित या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट टीम इंडियाबरोबर घडलेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asia cup

नेमकं घडलं तरी काय होतं, जाणून घ्या....
ही गोष्ट घडली होती ती १९८४ साली. भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारताचे कर्णधार कपिल देव होते. पण ज्यावेळी आशिया चषक १९८४ साली खेळवण्यात आला त्यावेली सुनील गावस्कर हे भारताचे कर्णधार होते. या वर्षी झालेल्या स्पर्धेत तीन संघांचाच समावेश होता. यामध्ये भारतासह पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ होते. ही स्पर्धा रॉबिन राऊंड पद्धतीने खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना हा श्रीलंकेबरोबर झाला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेच्या संघाला ९६ धावांमध्ये ऑल आऊट केले होते आणि एकही विकेट न गमावता भारताने हा सामान सहजपणे जिंकला होता. या सामन्यात भारताच्या सुरींदर खन्ना यांनी नाबाद ५१ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा पाकिस्तानबरोबर झाला होता.

वाचा-Breaking...अर्जुन तेंडुलकर मुंबईचा संघ सोडणार, पाहा आता कोणत्या नवीन टीममध्ये एंट्री करणार

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरींदर खन्ना यांच्या ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर १८८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला, पण त्यांचा डाव १३४ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने ५४ धावांनी दमदार विजय साकारला होता. भारताकडून या सामन्यात रॉजर बिन्नी यांनी सर्वाधिक तीन विकेट्स मिळवले होते.

वाचा-मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल, फिरकीपटू रशिद खानसह पाच खेळाडूंची संघात दमदार एंट्री...

पाकिस्तानला यापूर्वी श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता आणि पुन्हा एकदा भारताकडूनही त्यांचा पराभव झाला होता. ही स्पर्धा तीन संघ असल्यामुळे राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली होती. त्यामुळे भारताने दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांना जेतेपद देण्यात आले, तर श्रीलंकेने एक सामना जिंकल्यामुळे त्यांना दुसरे स्थान देण्यात आले. त्यामुळे कोणतीही फायनल न खेळता भारताने आशिया चषकाची ट्रॉफी पटकावली होती. ही स्पर्धा युएईमध्येच खेळवण्यात आली होती.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज