अ‍ॅपशहर

अजित आगरकर नव्हे तर हा जलद गोलंदाज होणार टीम इंडियाच्या निवड समितीचा प्रमुख; कारण फक्त एकच...

BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीच्या प्रमुखपदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंनी अर्ज केले आहेत. यात भारताच्या दोन माजी जलद गोलंदााजांचे नाव आघाडीवर आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2022, 6:05 pm
नवी दिल्ली: टी-२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली. बोर्डाने नव्या निवड समितीसाठी जाहिरात देखील दिली आणि त्यासाठी जवळ जवळ ८० जणांनी अर्ज केले आहे. अर्ज करणाऱ्यामध्ये माजी जलद गोलंदाज अजीत आगरकर याचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त होते. मात्र या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश असल्याचे समजते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ajit Agarkar


भारताचा माजी जलद गोलंदाज वेंकटेश प्रसाद देखील निवड समितीच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. प्रसादचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे समजते. प्रसादने २८ नोव्हेंबर रोजी या अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार प्रसादकडे असलेल्या अनुभवामुळे त्याची दावेदारी सर्वात मजबूत आहे. दरम्यान वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर ज्या चेतन शर्मा यांच्यासह सर्व समितीची बोर्डाने हकालपट्टी केली होती त्यांनी पुन्हा अर्ज केल्याचे वृत्त आहे.

वाचा- ऋतुराज गायकवाडचे विक्रमी शतक; नाबाद २२० नंतर केली पुन्हा एकदा वादळी खेळी

प्रसाद यांनी १९९६ ते २००१ या काळात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात त्याने ३३ कसोटी आणि १६१ वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर २९२ आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. या शिवाय प्रसाद यांनी २००७ च्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे गोलंदाजीचे कोच म्हणून काम केले होते. त्यानंतर २००८-०९ मध्ये ते आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे गोलंदाजीचे कोच होते. या शिवाय त्यांनी पंजाब किंग्ज, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश संघाचे गोलंदाजीचे कोच म्हणून काम केले.

वाचा- कोण आहेत मानसी किर्लोस्कर; वडिलांच्या निधनानंतर टाटांच्या सूनेला संभाळायचा आहे ५००...

वेंकटेश प्रसाद यांच्याकडे निवड समितीचा देखील अनुभव आहे. २०१६-१८ मध्ये ते १९ वर्षाखालील संघाच्या निवड समितीवर होते. त्यांनी निवडलेल्या संघाने २०१६ साली अंतिम तर २०१८ साली विजेतेपद मिळवले होते. प्रसाद यांच्याशिवाय डी वासू, कंवलजीत सिंह यांनी देखील अर्ज केला आहे. कंवलजीत यांचे वय ६४ असून बोर्डाने वयाची मर्यादा ६० ठेवली आहे.

वेस्ट झोनमधून सलील अंकोला, नयन मोंगिया आणि समीर दिघे यांनी अर्ज केला आहे. तर ईस्ट झोनमधून सुब्रतो बॅनर्जी आणि शिव सुंदर दास हे देखील स्पर्धेत आहेत. नॉर्थ झोनमधून निखिल चोपा यांनी अर्ज केलाय. चेतन शर्मा आणि हरविंदर सिंह यांनी पुन्हा अर्ज केला असला तरी त्यांनी निवड होणार नाही हे निश्चित आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख