अ‍ॅपशहर

भारतासाठी आली मोठी गुड न्यूज, ओव्हलच्या खेळपट्टीने कसा दिला ऑस्ट्रेलियाला धोका पाहा...

WTC Final : भारतीय संघासाठी आता गुड न्यूज आलेली आहे. ओव्हलच्या खेळपट्टीने ऑस्ट्रेलियाला यापूर्वीही धोका दिला आहे आणि या सामन्यातही त्यांना पुन्हा एकदा या खेळपट्टीने चांगलेच फसवल्याचे समोर आले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 10 Jun 2023, 8:27 pm
लंडन : ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २७० धावांवर घोषित केला. पण त्यानंतर आता भारताच्या संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण ओव्हलच्या खेळपट्टीने ऑस्ट्रेलियाच्या संघाला धोका दिल्याचे आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Team India
सौजन्य-बीसीसीआय


ऑस्ट्रेलियाचा संघ यावेळी ५०० धावांचे आव्हान भारतीय संघापुढे विजयासाठी ठेवेल, असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाने २७० धावांवर अचानक आपला डाव घोषित केला आणि भारतापुढे विजयासाठी ४४४ धावांचे आव्हान दिले. पण त्यानंतर जेव्हा भारतीय संघ खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. ओव्हलच्या खेळपट्टीबाबतची माहिती आता ऑस्ट्रेलियाच्या एका माजी कर्णधाराने दिली आहे. ही माहिती ऐकल्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला कसा मोठा धक्का बसू शकतो, हे आता समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी यावेळी सांगितले की, " ओव्हलची खेळपट्टी ही नेहमीच धोका देत आली आहे. सर्वांना या खेळपट्टीवर हिरवे गवत दिसत असते. त्यामुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणार, असे वाटत असते. पण ही गोष्ट दिसते तेवढी खरी नाही. कारण जेव्हा सूर्य आपलं डोकं वर काढतो आणि खेळपट्टीवर सूर्यकिरणे पडतात तेव्हा मात्र ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी पोषक समजली जाते. कारण ही खेळपट्टी वरून जरी हिरवीगार दिसत असली तरी ती आतमधून सुकलेली असते आणि फलंदाजीला पोषक ठरते. ऑस्ट्रेलियाच्या संघाला ओव्हलच्या खेळपट्टीने यापूर्वीही धोका दिला आहे. चार वर्षांपासून जेव्हा ओव्हलची खेळपट्टी आशीच हिरवीगार होती, ते पाहून ऑस्ट्रेलियाने एक मोठा निर्णय घेतला होता आणि त्याचा फटका संघाला बसला होता. त्यामुळे ओव्हलची खेळपट्टी ही नेहमीच अशी धोका देत आलेली आहे." सध्याच्या घडीला ओव्हलमध्ये चांगलाच सूर्यप्रकाश पडला आहे आणि त्यामुळे ही खेळपट्टी आता फलंदाजीसाठी पोषक झालेली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी आता ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे भारताच्या फलंदाजांनी लौकिकाला साजेसा खेळ केला तर नक्कीच त्यांना विजय मिळवता येऊ शकतो. त्यामुळे आता भारताचे फलंदाज या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करतात आणि किती वेळ तग धरून राहतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता भारताच्या फलंदाजांवर विजयाची मदार असणार आहे.

ओव्हलची खेळपट्टी आता फलंदाजीसाठी पोषक ठरली आहे. त्यामुळे भारतीय संघ आता किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख