अ‍ॅपशहर

आयपीएल होणार, सांगतोय रोहित शर्मा

यंदाच्या वर्षी आयपीेएल होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे कारण सध्याच्या घडीला देशामध्ये करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. पण तरीही यंदाच्या वर्षी आयपीेएल खेळवली जाऊ शकते, असे विश्वास मुंबई इंडियन्सा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2020, 6:34 pm
करोना व्हायरसचा फटका क्रीडा विश्वाला बसला आहे. भारतामध्येही काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत, तर काही पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. सध्या आयपीएल होणार की नाही, याबाबतही साशंकता आहे. पण चारवेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मात्र यंदाचे आयपीएल होणार, असा विश्वास बसला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma.


क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत IPL टी-२० क्रिकेट लीग या वर्षी २९ मार्चपासून सुरू होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. आयपीएल जेव्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा असे वाटले की करोनाच्या परिस्थिती सुधारणा झाल्यानंतर याचे आयोजन होईल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे. पण रोहिला मात्र यंदा आयपीएल होणार असे वाटत आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने रोहितची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये केव्हिनने रोहितला यंदाची आयपीएल होणार की नाही, असा प्रश्न विचारला होता.

यंदाच्या आयपीएलबाबत रोहित म्हणाला की, " यंदाची आयपीएल स्पर्धा होऊ शकते. पण हे सारे परिस्थितीवर अवलंबून आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली तर आयपीएल खेळवले जाऊ शकते. पण परिस्थिती कधी सुधारेल, हे आपण सांगू शकत नाही."

२१ दिवस देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक लोक घरात आहेत. त्यामुळे आता २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर देशाची परिस्थिती कशी आहे, याचा अंदाज बीसीसीआय घेईल आणि त्यानंतर आयपीएल खेळवायची की नाही, हा निर्णय घेण्यात येईल.
वाचा- क्रिकेट मैदानावर 'गब्बर'; आता घरी भांडी घासतोय!

बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत स्पर्धा स्थगित केली असली तरी आता मोदींनी जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. याआधी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी देखील १५ एप्रिलनंतरच आयपीएल बाबत निर्णय होईल असे स्पष्ट केले. केंद्र सरकार १५ एप्रिल रोजी करोना संदर्भात नवी अधिसूचना जारी करणार आहे. १५ एप्रिलला येणारे नवे आदेश पाहता त्याच दिवशी आयपीएल स्पर्धा सुरू करणे एक टक्का ही शक्य नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज