नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाला सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (david warner ) सोशल मीडियावर सक्रीय असतो. भारतीय गाण्यांची आवड असलेल्या वॉर्नरने करोना लॉकडाउन काळात पत्नी आणि मुलींसह अनेक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli)ने वॉर्नरच्या मुलीला कसोटी संघाची जर्सी भेट दिली होती. याचा फोटो वॉर्नरने सोशल मीडियावर शेअर केला होता. आता वॉर्नरची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाचा- पाहा व्हिडिओ: फिल्डिंग करताना कपडे बदलत होता खेळाडू आणि...
वॉर्नरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याची मुलगी क्रिकेट खेळताना दिसतेय. वॉर्नर मुलीला चेंडू टाकतो. पण तो चेंडू फास्ट असल्याने तिला मारता येत नाही. चेंडू फास्ट का टाकला यावरून ती बापावर नाराज होते आणि रागाने बॅट फेकून निघून जाते.
वाचा- निमित्त स्टेडियमच्या फोटोचे; भारत-पाकिस्तान चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर पुन्हा राडा
व्हिडिओत वॉर्नर आणि त्याचे कुटुंबीय नेटमध्ये क्रिकेट खेळताना दिसतात. तो मुलीला चेंडू टाकतो, ती तो मारण्याचा प्रयत्न करते पण तिला शक्य होत नाही. यावर ती बापाला रागावत, चेंडू फास्ट टाकू नको आणि रागाच्या भरत बॅट फेकून देते. हा व्हिडिओ शेअर करताना वॉर्नर म्हणतो, माझा सर्वात आवडता व्हिडिओ आहे. त्याने व्हिडिओत पत्नी कॅडीला देखील टॅग केले आहे आणि चाहत्यांना व्हिडिओसाठी कॅप्शन देण्यास सांगितले आहे.
वाचा- IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध विजयासाठी भारताकडे आहे हुकमी एक्का
विराटने भेट दिली होती जर्सी
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची मुलगी इंडी रे ही भारताचा कर्णधार विराट कोहलीची फार मोठी फॅन आहे. काही दिवसांपूर्वी विराटने तिला स्वत:ची जर्सी भेट दिली होती. वॉर्नरने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आम्ही मालिका गमावली आहे. पण आमच्याकडे एक मुलगी आहे जी फार खुस आहे. धन्यवाद विराट कोहली. कसोटी संघाची जर्सी दिल्या बद्दल इंडीला ही जर्सी खुप आवडली. तिला वडील आणि एरॉन फिंचसह विराट कोहली खुप आवडतो, असे वॉर्नरने हा फोटो शेअर करताना म्हटले होते. वॉर्नरला ३ मुली आहेत.