अ‍ॅपशहर

सेहवागने भारताच्या फलंदाजांना झापलं, फक्त एका वाक्यात जमिनीवर आणलं, म्हणाला...

IND vs AUS : भारताला दुसऱ्या वनडे सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारताला ११७ धावाच करता आल्या आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या खेळाडूंना चांगलेच झापले आहे. एका वाक्यात सेहवागने भारतीय खेळाडूंना जमिनीवर आणले आहे. सेहवागने या मोठ्या पराभवानंतर आता नेमकं काय म्हटलं आहे ते आता सर्वांपुढे आलेलं आहे ...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 20 Mar 2023, 9:39 pm
हनवी दिल्ली : भारतीय संघाचे दुसऱ्या वनडे सामन्यात वस्त्रहरण झाले. कारण भारताला या सामन्यात फक्त ११७ धावाच करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या पराभवानंतर भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आता टीम इंडियाच्या खेळाडूंना चांगलंच झापलं आहे. सेहवागने यावेळी फक्त एका वाक्यात भारतीय फलंदाजांना जमिनीवर आणलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virender Sehwag


भारतीय संघातील खेळाडू ब्रँड आहेत, असे म्हटले जाते. पण गेल्या सामन्यात भारताचे हे खेळाडू सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या वनडेमध्ये सुरुवातीपासूनच भारताला एकामागून एक धक्के बसायला सुरुवात झाली. या धक्क्यांतून भारतीय संघ सावरू शकला नाही. पत्त्यांच्या बंगल्यासारखा भारताचा डाव कोसळला आणि त्यांनी फक्त ११७ धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर सेहवागने भारतीय खेळाडूंना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.

सेहवाग म्हणाला की, " मी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो, जिथे माझी मानसिकता चौकार मारायची आणि धावा लवकर काढायची बनली होती. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याचमानसीकतेने खेळायचो आणि मला शतक करण्यासाठी आणखी किती चौकार लागतील ते मोजायचे. जर मी ९० धावांवर असलो आणि शतक गाठण्यासाठी १० चेंडू घेतले तर प्रतिस्पर्धी संघाकडे मला बाद करण्यासाठी १० चेंडू आहेत, असा विचार माझ्या डोक्यात यायचा. त्यामुळेच मी चौकार मारण्यावर जास्त भर द्यायचो. त्यामुळेच मला मोठ्या खेळी साकारता आल्या. पण सध्याच्या भारतीय संघात असे फलंदाज दिसत नाहीत, जे असा विचार करतील. सध्या भारतीय संघातील खेळाडू हे मोठ्या धावसंख्येचा विचार करत नाहीत, तर कमी धावसंख्येवरही ते समाधानी असतात. "

भारतीय संघातील खेळाडूंमध्ये धावांची भूक कमी आहे आणि त्यामुळेच ते कमी धावसंख्येवर बाद झाले तरी ते निराश होत नाहीत, असे सेहवागचे म्हणणे आहे. त्यामुळे एकाच वाक्यात सेहवागने भारताच्या फलंदाजांनी मानसीकता समोर आणत त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत आणि त्यांना जमिनीवर आणलं आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख