अ‍ॅपशहर

IPL झाल्यानंतर धोनी निवडणुकीच्या ड्यूटीवर? पाहा काय आहे प्रकरण

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल २०२२मध्ये फार चांगली कामगिरी करता आली नाही. गुणतक्त्यात त्यांना नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2022, 2:04 pm
रांची: आयपीएल २०२२मध्ये चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अतिशय खराब झाली. प्लेऑफमध्ये पोहोचण्यास अपयशी ठरलेल्या चेन्नईला गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. रविंद्र जडेजा आणि महेंद्र सिंह धोनी अशा दोघांच्या चेन्नईचे नेतृत्व केले होते. १४ पैकी त्यांना फक्त ४ सामन्यात विजय मिळवता आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vivek Kumar
विवेक कुमार


स्पर्धेतील आव्हान लवकर संपुष्टात आल्याने धोनी लवकर घरी गेला. या दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात धोनी सारखा दिसणारा एक व्यक्ती ग्राम पंचायत निवडणुकीत काम करतोय.

वाचा- 'विराट' विक्रम मोडणे राजस्थानच्या 'रॉयल' साठी कठीण, पण दिग्गजांना मागे टाकण्याची संधी

सध्या झारखंडमध्ये पंचायत निवडणुका सुरू आहेत. यासाठी मतदान केंद्रावर ड्यूटी करणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झालाय. ही व्यक्ती भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसारखा दिसतोय. ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे त्याचे नाव विवेक कुमार असून ते सीसीएलमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम करत आहेत.

वाचा- IPL 2022: चहल-हसरंगामध्ये 'काटे की टक्कर', कोण ठरेल क्वालिफायर २ चा 'किंग'

विवेक कुमार हे रांचीमधील ग्राम पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एका मदतान केंद्रावर काम करत होते. धोनी सारख्या दिसणाऱ्या विवेकला पाहिल्यानंतर अनेक जण त्यांच्या सोबत फोटो काढतात. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत.

वाचा- बेंगळुरूचे दोन धुरंधर सॅमसनसाठी ठरू शकतात खलनायक, राजस्थानच्या फायनलचे स्वप्न धुळीस मिळवतील

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा महेंद्र सिंह धोनी सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळतो. आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या आधी त्याने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोडले होते. पण हंगामाच्या मध्येच पुन्हा धोनीकडे कर्णधारपद देण्यात आले. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करता न आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख