अ‍ॅपशहर

IND vs SA: रात्री ७.३० नाही तर या वेळी सुरू होणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मॅच; वाचा सर्व अपडेट

IND vs SA 1st T20 Live Streaming: ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारताची लढत आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघातील पहिली मॅच आज तिरुवनंतपुरम येथे होणार आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2022, 1:46 pm
तिरुवनंतपुरम: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आज टी-२० मालिकेतील पहिली लढत तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव करून टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारत टी-२० वर्ल्डकपची जोरदार तयारी करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यासाठी भारतीय संघातील काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यात भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs SA


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या लढती संदर्भातील सर्व अपडेट जाणून घ्या...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच कुठे होणार आहे?
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच किती वाजता सुरू होईल?
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच भारतीय वेळेनुसार रात्री ७ वाजता सुरू होईल.

वाचा- टी-२० वर्ल्ड कप तोंडावर; टीम इंडियाला सुधारणेची अखेरची संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅचचा टॉस किती वाजता होणार?
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅचचा टॉस रात्री ६.३० वाजता होईल.

वाचा- IND vs PAK टी-२० वर्ल्डकप मॅच: MCG तयार केली जात आहे नवी खेळपट्टी, पाहा कसे असेल पिच

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅचचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच लाइव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.

वाचा- स्टार कर्णधारावर बलात्काराचा आरोप; क्रिकेटपटू फरार, पोलिसांनी घेतली इंटरपोल मदत

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी-२० मॅच लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. तसेच maharashtratimes.com वर लाइव्ह अपडेट आणि स्कोअरकार्ड पाहू शकता.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज