रायपूर : रोहित शर्माचे चाहते अगणित आहे. असाच एक चाहता सामना सुरु असताना मैदानात घुसला. त्यावेळी रोहित शर्मा हा फलंदाजी करत होता. या चाहत्याने थेट रोहितला जादूची झप्पीच दिली. पण त्यानंतर मैदानातील सुरक्षा रक्षकांनी या मुलाला पकडलं. पण त्यानंतर रोहित फक्त एक वाक्य बोलला आणि त्याने सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट घडली ती १०व्या षटकात, त्यावेळी रोहित शर्मा हा ३७ धावांवर फलंदाजी करत होता. पण ही धडाकेबाज खेळी साकारत असताना एक वेगळीच गोष्ट मैदानात घडली. रोहित फलंदाजी करत असताना त्याचा एक लहान फॅन मैदानात आला. सुरक्षारक्षकांना चकवा देत तो थेट रोहितपर्यंत पोहोचला. रोहितला त्याने घट्ट मिठी मारली. रोहित शर्माला भेटल्याचा आनंद त्याला लहानग्या चाहत्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण त्याचवेळी मैदानात सुरक्ष रक्षक धावत आले आणि त्यांनी या लहानग्या फॅनला रोहितपासून वेगळे केले. पण हे सर्व घडत असताना हा लहाॉनगा फॅन रडवेला झाला होता. पण त्याचवेळी रोहित शर्माने फक्त एक गोष्ट केली आणि सर्वांची मनं जिंकली.
सुरक्षा रक्षक या चाहत्याला रोहितपासून वेगळे करत होते आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले होते. पण त्यावेळी रोहितने या आपल्या लहानग्या फॅनचा चेहरा पाहिला आणि त्याने एक गोष्ट केली. रोहितने यावेळी सुरक्ष रक्षकाला सांगितले की, " या माझ्या लहानग्या फॅनवर तुम्ही कोणतीही कारवाई करू नका आणि त्याला सांभाळून घेऊन जा." रोहितचे बरेच फॅॅन्स असतील. पण आपल्या फॅन्सला जपाययचे कसे, हे रोहितकडून शिकायला हवे. त्यामुळे रोहितने आपल्या फॅनसाठी जी गोष्ट केली ती सर्वांनाच समजली आणि या एका वाक्याने रोहितने सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्मा आजच्या सामन्यात चांगलाच चमकला. टॉसनंतर तो काही काळ ब्लँक झाला होता. पण त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो भारताच्या पथ्यावर पडला. त्यामुळे भारताला न्यूझीलंडला १०८ धावांवर ऑल आऊट करता आले. या आव्हानाचा पाठलाग करत असताना रोहितने अर्धशतक झळकावले आणि कर्णधाराला साजेशी खेळी साकारली. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना रोहित शर्मा मैदानात उतरला आणि त्याने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली. रोहितने धडाकेबाज फलंदाजी केली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे आता रोहित तिसऱ्या सामन्यात कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.