अ‍ॅपशहर

भारतीय संघ सामन्याच्या चौथ्या दिवशीच का घाबरलेला होता, समोर आलं आता मोठं कारण...

भारतीय संघाने जेव्हा ३५० धावांची आघाडी घेतली होती, तेव्हाच चाहत्यांनी विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली होती. पण त्याचवेळी भारताचा संघ हा त्यावेळी घाबरलेला होता. भारतीय संघ चौथ्यादिवशीचा लंच झाला तेव्हा चिंताग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. लंच झाला तेव्हा भारताकडे ३६१ धावांची आघाडी होती, पण तरीही भारतीय संघ का चिंतेत होता, पाहा

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 5 Jul 2022, 5:37 pm
बर्मिंगहम : भारतीय संघ ऐतिहासिक विजयाचे स्वप्न पाहत होता, असे सर्वांनाच वाटत होते. पण त्याचवेळी भारताचा संघ हा चौथ्या दिवशीच घाबरलेला होता, अशी एक मोठी गोष्ट समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारतीय संघ (सौजन्य-ट्विटटर)

भारतीय संघ चौथ्या दिवशी नेमका का घाबरला होता, जाणून घ्या...
भारतीय संघ दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत मोठे आव्हान उभारत आहे, असे सर्वांनाच वाटत होते. भारतीय संघाने जेव्हा आव्हान देताना ३५० धावांचा पल्ला गाठला होता, तेव्हा भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण त्याचवेळी भारताच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण होते. ही चिंता त्यांना आपण किती धावा करू शकतो, हे पाहून आली होती. कारण जेव्हा चौथ्या दिवसाचा लंच झाला तेव्हा भारताची ७ बाद २२९ अशी स्थिती होती. त्यावेळी भारताची एकूण आघाडी ही ३६१ धावांची झाली होती. पण तरीही भारतीय संघ चिंतेत होता. कारण त्यावेळी रवींद्र जडेजा सोडल्यास कोणताही बिनीचा फलंदाज हा खेळपट्टीवर नव्हता. त्याचबरोबर भारताचे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना चांगली फलंदाजी येत नसल्याचे भारतीय संघाला माहिती होते. त्यामुळे आता भारतीय संघ जास्त मजल मारू शकच नाही, हे त्यांना समजून चुकले होते आणि हीच गोष्ट पाहायला मिळाली. कारण लंचच्या वेळी भारतीय संघाच्या ७ बाद २२९ धावा होत्या आणि त्यानंतर टीम इंडियाला फक्त १६ धावाच करता आल्या होत्या. लंचनंतर फक्त सात धावांमध्ये जडेजा बाद झाला होता आणि त्यानंतर तर भारतीय संघ जास्त धावा करू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते.

भारताचा संघ चौथ्या दिवशीच्या लंचच्यावेळी घाबरला होता. याबाबतचे मोठे कारण यावेळी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावेळी सांगितले होते. शास्त्री यांनी हे सांगत असताना चौथ्या दिवशीच्या लंचचा उल्लेख केला होता. भारतीय संघ चौथ्या दिवशी लंचच्यावेळी घाबरलेला होता, हे शास्त्री यांनी समालोचन करत असताना सांगितले होते आणि त्यांची हीच गोष्ट खरी ठरल्याचे पाहायला मिळाले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख