अ‍ॅपशहर

क्रिकेटपटूचे धक्कादायक वर्तन; बलात्कार करणाऱ्या मित्राला केली अशी मदत

Yasir Shah in Trouble: पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळणारा फिरकीपटू यासिर शहा याच्यावर एक धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. १४ वर्षाच्या मुलीने पाह काय म्हटलय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2021, 10:42 am
इस्लामाबाद: पाकिस्तानचे क्रिकेटपटू अनेकदा मैदानाबाहेरील घटनेमुळे चर्चेत येत असतात. मॅच फिक्सिंग किंवा अन्य कोणत्या तरी घटनेमुळे वादात अडणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंपैकी एकावर आता धक्कादायक असा आरोप करण्यात आला आहे. इस्लामाबादमधील शालीमार पोलिस ठाण्यात एका १४ वर्षीय मुलीने फिरकीपटू यासिर शाह याच्यावर एक गंभीर असा आरोप करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम यासिर शहा
क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप


वाचा-जलद गोलंदाजावर फिरकीपटू होण्याची वेळ; सामना सुरू असताना पाहा काय झाले

एका १४ वर्षीय मुलीने शाहवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, यासिर शहाच्या मित्राने बंदुकीच्या धाकावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील केला. मुलीने तिचे शोषण केल्याचा आरोप देखील केलाय. पाकिस्तानमधील वेबसाईट जिओ न्यूजनुसार संबंधित मुलीने या प्रकरणी वॉट्सअॅपवरून यासिर सोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझी चेष्टा केली. इतक नव्हे तर यासिरने तिला असे देखील सांगितले की मला कमी वयाच्या मुली आवडतात.

वाचा-क्रिकेटच्या मैदानावर असे कधीच घडले नाही; पावसामुळे सामना थांबला तर...

पीडित मुलीने असे देखील म्हटले आहे की, यासिरने तिला गप्प बसण्याची धमकी देखील दिली. जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. यासिर शहा एका मोठ्या अधिकाऱ्याला ओळखतो. तो आणि फरहान वयाने लहान असलेल्या मुलीवर बलात्कार करतात. या प्रकरणी जेव्हा मी पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले तेव्हा यासिरने घर खरेदी करून देण्याचे तसेच पुढील १८ वर्ष माझा खर्च उचरण्याची ऑफर दिली.

महत्वाचे लेख