अ‍ॅपशहर

सुरेश रैना बाबा झाला; मुलीचे नाव 'ग्रेसिया'

भारतीय संघातील फलंदाज सुरेश रैना रविवारी पिता बनला. याची माहिती स्वतः सुरेश रैनाने ट्विटरवरुन दिली. 'माझी सुंदर मुलगी ग्रेसिया रैना हिचे स्वागत करा, ती लवकरच फोटोशूटसाठी तयार होत आहे, असे ट्विट रैनाने केले.

Maharashtra Times 16 May 2016, 8:46 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cricketer suresh raina becomes father of a girl
सुरेश रैना बाबा झाला; मुलीचे नाव 'ग्रेसिया'


भारतीय संघातील फलंदाज सुरेश रैना रविवारी पिता बनला. याची माहिती स्वतः सुरेश रैनाने ट्विटरवरुन दिली. 'माझी सुंदर मुलगी ग्रेसिया रैना हिचे स्वागत करा, ती लवकरच फोटोशूटसाठी तयार होत आहे, असे ट्विट रैनाने केले.



ट्विट केल्यानंतर सुरेश रैनाने पत्नी प्रियांकासोबत मुलीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. सुरेश रैनाची पत्नी हॉलंडमध्ये वास्तव्याला असून त्या ठिकाणी बॅंकेत नोकरी करीत असल्याने प्रियांकाने हॉलंडमध्ये मुलीला जन्म दिला आहे. सध्या आयपीएल सामने सुरु असून सुरेश रैना गुजरात लायन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. मुलीला पाहण्यासाठी आयपीएलचे सामने सोडून रैना हॉलंडला गेला आहे. दरम्यान, सुरेश रैना आणि प्रियांका चौधरी यांचा विवाह गेल्यावर्षी ३ एप्रिल रोजी झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज