नवी दिल्लीः यंदाच्या आयपीएलमध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या संघव्यवस्थापनाने शनिवारी डेव्हिड मिलरकडून कर्णधारपद काढून घेतले. त्याच्याऐवजी भारताच्या मुरली विजयकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. खेळाडू म्हणून मिलरचा संघात समावेश असेल. नेतृत्वाच्या जबाबदारीमुळे मिलरच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेणे आवश्यक होते, असे पंजाब संघाचा सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगरने सांगितले.
मिलरऐवजी विजय कर्णधार
यंदाच्या आयपीएलमध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या संघव्यवस्थापनाने शनिवारी डेव्हिड मिलरकडून कर्णधारपद काढून घेतले.
Maharashtra Times 1 May 2016, 1:31 am