अ‍ॅपशहर

इंग्लंडला पावसाचा फटका

पावसामुळे अॅशेस मालिकेतील चौथी मेलबर्न कसोटी जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न अपूर्ण राहणार असे दिसते आहे. सततच्या पावसामुळे पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ लवकर बंद करण्याची घोषणा केली. हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २ बाद १०३ धावा झाल्या होत्या. वॉर्नर ४०, तर कर्णधार २५ धावांवर खेळत होते. यजमान ऑस्ट्रेलिया अजूनही ६१ धावांनी पिछाडीवर आहे.

Maharashtra Times 30 Dec 2017, 4:00 am
मेलबर्नः पावसामुळे अॅशेस मालिकेतील चौथी मेलबर्न कसोटी जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न अपूर्ण राहणार असे दिसते आहे. सततच्या पावसामुळे पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ लवकर बंद करण्याची घोषणा केली. हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २ बाद १०३ धावा झाल्या होत्या. वॉर्नर ४०, तर कर्णधार २५ धावांवर खेळत होते. यजमान ऑस्ट्रेलिया अजूनही ६१ धावांनी पिछाडीवर आहे. यामुळे इंग्लंडच्या डोक्यालाच ‘ताप’ झाल्यासारखा झाला. दरम्यान हा वेळ थोड्याफार प्रमाणात का होईना भरून काढण्यासाठी शनिवारी दिवसाच्या खेळाची सुरुवात लवकर करण्यात येईल. आम्ही उद्या मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर वापर करू, असे इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्याकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम england reject ball tampering as rain halts victory push
इंग्लंडला पावसाचा फटका


चेंडू कुरतडला नाही!

चेंडू कुरतडल्याचे आरोप इंग्लंड संघाने शुक्रवारी धुडकावून लावले. इंग्लंडचा तेज गोलंदाज जेम्स अँडरसन आपल्या अंगठ्याच्या नखाने चेंडूसह करत असल्याचे व्हीडिओमध्ये बघायला मिळाले. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉर्न म्हणाला, ‘गोलंदाज चेंडूला आपली नख लावू शकतो का, याबाबत मला खात्रीलायक काहीच ठाऊक नाही’. बेलिस यांनी मात्र या वृत्तानंतर सामन्यातील पंचांशी संपर्क साधत शहानिशा केली. ‘पंचांनीच मला सांगितले की, चिंतेचे कारण नाही. हे वृत्त म्हणजे फक्त पराचा कावळा आहे एवढेच’, असे बेलिस यांनी स्पष्ट केले.

स्कोअरबोर्डः ऑस्ट्रेलिया ३२७ आणि २ बाद १०३ (कॅमरून बँक्रॉफ्ट २७, डेव्हिड वॉर्नर खेळत आहे ४०, उस्मान ख्वाजा ११, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे २५; जेम्स अँडरसन ११-५-२०-१, ख्रिस वोक्स ११.५-६-२४-१) वि. इंग्लंड ४९१.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज