अ‍ॅपशहर

विंडीजविरुद्धची मालिका इंग्लंडने जिंकली

जेम्स अँडरसनच्या दुसऱ्या डावातील भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवशीच ९ विकेटनी विजय नोंदवला.

Maharashtra Times 10 Sep 2017, 4:03 am
लंडन : जेम्स अँडरसनच्या दुसऱ्या डावातील भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवशीच ९ विकेटनी विजय नोंदवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली आहे. कसोटी कारकिर्दीत पाचशे विकेटचा टप्पा ओलांडणाऱ्या अँडरसनने ४२ धावांत ७ विकेट घेऊन विंडीजचा दुसरा डाव १७७ धावांत संपवला. त्यानंतर, इंग्लंडने १०७ धावांचे विजयी लक्ष्य चहापानापूर्वीच एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम england won the three match series
विंडीजविरुद्धची मालिका इंग्लंडने जिंकली

संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज - पहिला डाव १२३ आणि दुसरा डाव ६५.१ षटकांत सर्वबाद १७७ (शाय होप ६२, कायरन पॉवेल ४५, जेसन होल्डर, जेम्स अँडरसन ७-४२, स्टुअर्ट ब्रॉड २-३५) पराभूत विरुद्ध इंग्लंड - पहिला डाव १९४ आणि दुसरा डाव २८ षटकांत १ बाद १०७ (मार्क स्टोनमन नाबाद ४०, टॉम वेस्टली नाबाद ४४, देवेंद्र बिशू १-३५). सामनावीर - बेन स्टोक्स. मालिकावीर - जेम्स अँडरसन, शाय होप.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज