अ‍ॅपशहर

'भारताच्या धमकीमुळे लंकेच्या खेळाडूंचा पाक दौरा रद्द'

श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंनी सरक्षेच्या कारणावरून आपला पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानानने याचे खापर भारताच्या माथ्यावर मारले आहे. भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावल्याचा थेट आरोपही पाकिस्ताना सरकारचे मंत्री फवाद हुसैन यांनी केला आहे. भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंचा आयपीएल करार रद्द करण्याची धमकी दिल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार दिल्याचे वक्तव्य फवाद हुसैन यांनी केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2019, 3:09 pm
इस्लामाबाद: श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंनी सरक्षेच्या कारणावरून आपला पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानानने याचे खापर भारताच्या माथ्यावर मारले आहे. भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावल्याचा थेट आरोपही पाकिस्ताना सरकारचे मंत्री फवाद हुसैन यांनी केला आहे. भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंचा आयपीएल करार रद्द करण्याची धमकी दिल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार दिल्याचे वक्तव्य फवाद हुसैन यांनी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fawad-hussain-maharashtrati


फवाद हुसैन यांनी ट्विटद्वारे हा आरोप भारतावर लावला आहे. भारताचे हे कृत्य अतिशय खालच्या दर्जाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचा सर्वांनीच निषेध करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या १० खेळाडूंनी आपले नाव पाकिस्तान दौऱ्यातून रद्द केले आहे. श्रीलंकेला सप्टेंबर-ऑक्टोबकमध्ये पाकिस्तानात मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. ज्या श्रीलंकेचया खेळाडूंनी दौऱ्यातून आपले नाव रद्द करवून घेतले, त्या खेळाडूंमध्ये दिमुथ करुणारत्ने, टी-२० कर्णधार लसिथ मलिंगा, माजी कर्णधार एंजेलो मॅथ्यूज, निरोशन डिक्वेला, कुसल परेरा, धनंजय डीसिल्व्हा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश आहे.

पाकिस्तानात श्रीलंकेच्या क्रिकेट संघावार सन २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे. त्यानंतर जगभरातील अनेक क्रिकेट संघांनी पाकिस्तान दौऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. सन २०१५ मध्ये झिम्बाब्वे आणि सन २०१८ मध्ये वेस्ट इंडिज संघाने पाकिस्तान दौरे जरूर केले आहेत, मात्र, यांव्यतिरिक्त मोठ्या संघांनी पाक दौरे टाळलेलेच आहेत. यावेळी मात्र, श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला जाण्याची तयारी दाखवली खरी, मात्र श्रीलंकेच्या खेळाडूंनी मात्र पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज