अ‍ॅपशहर

शास्त्रींचा विक्रम मोडीत

इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत ग्लॅमॉर्गन संघाचा युवा फलंदाज अॅन्युरिन डॉनल्डने डर्बिशायरविरुद्धच्या सामन्यात अवघ्या १२३ चेंडूंत द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. या कामगिरीमुळे त्याने भारताचे माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील वेगवान द्विशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Maharashtra Times 19 Jul 2016, 12:18 am
कॉल्विन बेः इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत ग्लॅमॉर्गन संघाचा युवा फलंदाज अॅन्युरिन डॉनल्डने डर्बिशायरविरुद्धच्या सामन्यात अवघ्या १२३ चेंडूंत द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. या कामगिरीमुळे त्याने भारताचे माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील वेगवान द्विशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्लॅमॉर्गन संघाची अवस्था ३ बाद ९६ अशी झाली होती. १९ वर्षीय डॉनल्डने पहिल्या ८० चेंडूंमध्ये १५ चौकार व ४ षटकारांसह शतक पूर्ण केले. त्याने पुढील शंभर धावा अवघ्या ४३ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. त्याने एकूण १३६ चेंडूंमध्ये २६ चौकार १५ षटकारांसह २३४ धावांची खेळी केली. त्याच्या द्विशतकामुळे ग्लॅमॉर्गन संघाला पहिल्या डावात ५१८ धावांपर्यंत मजल मारता आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम glamorgan batsman aneurin donald equals ravi shastris record
शास्त्रींचा विक्रम मोडीत


शास्त्री यांनी रणजी करंडक स्पर्धेच्या १९८४-१९८५ च्या मोसमात तत्कालीन बॉम्बे संघाकडून खेळताना बडोद्याविरुद्ध १२३ चेंडूंमध्ये नाबाद २०० धावा फटकावल्या होत्या. हे द्विशतक त्यांनी केवळ ११३ मिनिटांमध्ये झळकावले असून, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी वेळात द्विशतक झळकावण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, रवी शास्त्री हे सुद्धा आपल्या कारकिर्दीत काउंटी क्रिकेटमध्ये ग्लॅमॉर्गन संघाकडून खेळले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज