अ‍ॅपशहर

...म्हणून रामचंद्र गुहा BCCIमधून बाहेर

सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देण्यामागचं खरं कारण अखेर समोर आलं आहे. गुहा यांचं राजीनामापत्र मीडियाच्या हाती लागलं असून त्यात त्यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या भोंगळ कारभाराचा ठपका ठेवला आहे.

Maharashtra Times 2 Jun 2017, 2:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम guha hits out at dravid gavaskar dhoni in resignation letter
...म्हणून रामचंद्र गुहा BCCIमधून बाहेर


सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देण्यामागचं खरं कारण अखेर समोर आलं आहे. गुहा यांचं राजीनामापत्र मीडियाच्या हाती लागलं असून त्यात त्यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या भोंगळ कारभाराचा ठपका ठेवला आहे. भारतीय क्रिकेट हे दिग्गज खेळाडूंच्या प्रभावाखाली (सुपरस्टार सिंड्रोम) असल्याचा आरोप करतानाच गुहा यांनी सुनील गावसकर, राहुल द्रविड व महेंद्रसिंग धोनी यांच्यावरही तोफ डागली आहे.

काय आहेत गुहा यांचे आक्षेप?

>> खेळाडू व अन्य पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांना पायबंद घालण्यात प्रशासकीय समितीला अपयश.

>> राहुल द्रविड हा आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल या संघाबरोबरच भारताच्या 'अंडर १९' व 'अ' संघाचा प्रशिक्षक आहे. तो आपल्या मूळ कामापेक्षा आयपीएलमध्येच जास्त रमतो.

>> २०१४मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही महेंद्रसिंग धोनी हा बीसीसीआयच्या 'अ' श्रेणीतील खेळाडूंच्या यादीत आहे.

>> अनिल कुंबळे यानं प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली असतानाही त्याला आणखी संधी न देता नव्या प्रशिक्षकासाठी मुलाखती घेतल्या जात आहेत.

>> स्थानिक क्रिकेटपटूंकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंच्या तुलनेत त्यांना अगदीच किरकोळ मानधन दिलं जातं.

>> अपात्र ठरविण्यात आलेले काही लोक अजूनही बीसीसीआयच्या बैठकांना हजेरी लावतात. त्यावर प्रशासकीय समितीकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

>> बीसीसीआयनं समालोचक म्हणून नियुक्त केलेले सुनील गावसकर एका प्लेयर मॅनेजमेंट कंपनीचे प्रमुख आहेत.

>> माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ याचा समितीत समावेश करण्याच्या प्रस्तावाला विरोध.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज