अ‍ॅपशहर

वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीतकडे नेतृत्व

आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौर हिच्याकडे सहाव्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे...

Maharashtra Times 29 Sep 2018, 4:41 am
नवी दिल्ली : आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौर हिच्याकडे सहाव्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान वेस्ट इंडिज येथे होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम harnanpreet


अखिल भारतीय महिला निवड समितीने शुक्रवारी पंधरा सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. यात महाराष्ट्राची स्मृती मंधाना हिच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या वर्षी स्मृती चांगल्या फॉर्मात आहे. मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिगेझ, अनुजा पाटील, एकता बिश्त आणि पूनम यादव यांना संघात स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचा 'ब' गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंडचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघांचा समावेश आहे. २००९ आणि २०१०च्या उपांत्य फेरीत प्रवेश, ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. २०१६मध्ये भारतात झालेला वर्ल्ड कप वेस्ट इंडिज संघाने उंचावला होता.

भारताचे सामने : ९ नोव्हेंबर वि. न्यूझीलंड; ११ नोव्हेंबर वि. पाकिस्तान; १५ नोव्हेंबर वि. आयर्लंड; १७ नोव्हेंबर वि. ऑस्ट्रेलिया.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कप्तान), स्मृती मंधाना, मिताली राज, जेमिमा रॉड्रिगेझ, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तानया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, डी. हेमलता, मानसी जोशी, पूजा वस्रकार, अरुंधती रेड्डी.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज