अ‍ॅपशहर

आराध्यचे शतक हुकले

आयुष शर्माने घेतलेल्या ७४ धावांतील ७ बळींनंतरही आर.एन. पोदार शाळेला पार्ले टिळक इंग्लिश शाळेकडून १० विकेटसनी हार सहन करावी लागली. अन्य लढतीत दिगंबर पाटकर शाळेच्या आराध्य शिंदेचे (९४) शतक हुकले पण त्यांनी एचव्हीबी अकादमीवर पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर मात केली. गोकुळधामने सेंट फ्रान्सिसवर पहिल्या डावाच्या आघाडीमुळे विजय मिळविला. तर वेदान गाभावालाच्या (ना. ४९ आणि ४-६३ बळी) या अष्टपैलू कामगिरीनंतरही सेंट मेरीला अंजुमन शाळेकडून एक डाव आणि ३५ धावांनी मात सहन करावी लागली.

Maharashtra Times 1 Dec 2016, 4:00 am
मुंबई: आयुष शर्माने घेतलेल्या ७४ धावांतील ७ बळींनंतरही आर.एन. पोदार शाळेला पार्ले टिळक इंग्लिश शाळेकडून १० विकेटसनी हार सहन करावी लागली. अन्य लढतीत दिगंबर पाटकर शाळेच्या आराध्य शिंदेचे (९४) शतक हुकले पण त्यांनी एचव्हीबी अकादमीवर पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर मात केली. गोकुळधामने सेंट फ्रान्सिसवर पहिल्या डावाच्या आघाडीमुळे विजय मिळविला. तर वेदान गाभावालाच्या (ना. ४९ आणि ४-६३ बळी) या अष्टपैलू कामगिरीनंतरही सेंट मेरीला अंजुमन शाळेकडून एक डाव आणि ३५ धावांनी मात सहन करावी लागली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम harris shield 2016
आराध्यचे शतक हुकले


स्कोअरबोर्ड : अ गट - एचव्हीबी १६३ पराभूत पहिल्या डावावर विजयी वि. दिगंबर पाटकर विद्यालय ६-३१३ (आदित्य जावडे ८७, शुभम कळंबे ३७, आराध्य शिंदे ९४, श्रीओम सानप ३२). ब गट - सेंट मेरी ७१ आणि १२१ (वेदांत गाभावाला ना. ४९, अजित गौड ३-२९) एक डाव आणि ३५ धावांनी पराभूत वि. अंजुमन इस्लाम अलाना २३१ (सैफन शेख ७२, अरमान पठाण ३९, प्रशांत मिश्रा ना. ४७, वेदांत गाभावाला ४-६३, मिर तावडे ४-६५). क गट - आर.एन. पोदार १०६ आणि १५३ (युवराजसिंग भट्टी ३-४४)पराभूत वि. पार्ले टिळक इंग्रजी १८५ (शंतनू बेहेरे ७६, आर्यन मोरे ३१, आयुष शर्मा ७-७४) आणि ७७-० (आर्यन मोरे ना. ५२) १० विकेटसनी विजयी. ड गट – सेंट फ्रान्सिस १४२ (खुश जैन ५-१९, आर्य पोळ ३-५३) पराभूत वि. गोकुळधाम ३७३ (आदित्य देव ४९, अर्ष ६८, आर्य पोळ ६८, खुश जैन ना. ४१, तरण राजपाल ना. ३०, सनथ शेट्टी ३-६७, वेदांत सावंत ४-१०७).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज