कोलकाता : रशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचे आयपीएल अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले. हैदराबादने हा सामना १३ धावांनी जिंकला. आता येत्या रविवारी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम फेरीत हैदराबादची गाठ चेन्नई सुपर किंग्जशी पडेल. ईडन गार्डन्सवरील या सामन्यात रशिद खानच्या १० धावांत ३४ धावा, १९ धावांत ३ बळी आणि दोन झेलांसह एक धावचीत करण्याची कामगिरी हैदराबादच्या विजयात मोलाची ठरली.
हैदराबाद-चेन्नई फायनल
रशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचे आयपीएल अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले...
Maharashtra Times 26 May 2018, 4:00 am